Ram Mandir  esakal
लाइफस्टाइल

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 22 जानेवारीचीच तारीख का निवडण्यात आली?

या दिवशी अनेक योग जुळून येत आहेत

Pooja Karande-Kadam

Ram Mandir :

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराच्या बांधकामाचे काम सध्या जोरात सुरू आहे. राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी दिवस राम मंदिरात प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार आहेत. पण 22 जानेवारी हीच तारीख का निवडण्यात आली यामागे काही कारणं आहेत.

प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी हा शुभ दिवस आहे. या दिवसभरातील फक्त 84 सेकंदांचा अत्यंत शुभ मुहूर्त असेल. पण तुमच्या मनात हा प्रश्न येतो का की या शुभ कार्यासाठी 22 जानेवारीची निवड का करण्यात आली? या मागचे कारण जाणून घेऊया.

मूर्ती स्थापनेचा मुहूर्त किती?

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की राम ललाची मूर्ती स्थापित करण्याचा शुभ मुहूर्त 84 सेकंद आहे, जो 12:29 मिनिटे 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद असा अत्यंत शुभ काळ आहे. श्री रामांच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर महापूजा आणि महाआरती होईल.

22 जानेवारी 2024 ही तारीख का?

हिंदू कॅलेंडरनुसार, 22 जानेवारी ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तारीख आहे. नक्षत्र मृगाशिरा आणि ब्रह्म योग सकाळी ८.४७ पर्यंत असून त्यानंतर इंद्र योग होईल.

ज्योतिषांच्या मते 22 जानेवारी ही कर्म द्वादशी आहे. ही द्वादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केल्याचे सांगितले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला आणि समुद्रमंथनात मदत केली.  

भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असून या दिवसाची निवड करण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिर पूर्णत्वास येत आहे

या दिवशी आहे शुभ योग

ज्योतिषांच्या मते 22 जानेवारीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवियोग असे तीन शुभ योग तयार होत आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

या योगांमध्ये कोणतेही काम केल्यास व्यक्तीला सर्व प्रकारच्या कामात यश मिळते, त्यामुळेच या दिवसाची निवड करण्यात आल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Deploys 12 Nuclear Warheads: दुनियावालों हमें बचाओ! भारताने इतिहासात पहिल्यांदाच गोदामातून काढले १२ अणुबॉम्ब; पाकची भीतीने गाळण

नुकताच साजरा केला वाढदिवस; किती वर्षांची झाली तेजश्री प्रधान? फोटो शेअर करत सांगितलं स्वतःचं खरं वय

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

Kalyan: निर्दयीपणाचा कळस! जन्मानंतर अवघ्या सहा दिवसांतच चिमुकलीला कचऱ्यात टाकलं; कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना

१.७ लाखांचा पगार... तरी महिनाअखेर खात्यात उरतात फक्त २,५२० रुपये; प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट

SCROLL FOR NEXT