republic day rangoli idea  esakal
लाइफस्टाइल

Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनी काढा सुंदर अन् आकर्षक रांगोळ्या, वाढेल अंगणाची शोभा

Republic Day 2025 rangoli designs : नक्की कोणत्या रांगोळ्या काढाव्यात असा प्रश्न आहे? या आहेत खूप सोप्या रांगोळ्या..

सकाळ डिजिटल टीम

आज संपूर्ण भारत देश 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत, ऑफिसमध्ये, कॉलेजेसमध्ये, घराबाहेर लोकं रांगोळ्या काढत असतात, पण त्याच त्याच संस्कार भारतीच्या रांगोळ्या आता जुन्या झाल्यात.. पण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन विशेष पोस्टर रांगोळी काढू शकत नाही.

मग नक्की कोणत्या रांगोळ्या काढाव्यात असा प्रश्न आहे? या आहेत खूप सोप्या रांगोळ्या ज्या तुम्ही अगदी थोड्या वेळात काढू शकता.

republic day rangoli idea

ही रांगोळी अगदी छोट्याशा जागी सुद्धा काढता येईल अशी आहे, एका चौकोनात आपल्या तिरंग्याचे रंग काढून आजूबाजूला तुम्ही फुलांची डिझाईन करू शकतात.

republic day rangoli idea

आपल्याकडे ध्वजारोहण झालं की पक्षी आकाशात उडवण्याची प्रथा आहे, तुम्ही याचं प्रतीक असलेली ही रांगोळी काढू शकतात आणि आजूबाजूने मोऱ्याच्या पिसांची सुद्धा डिझाईन काढू शकतात.

republic day rangoli idea

एक गोल काढून त्याच्या अवतीभोवती पांढऱ्या रांगोळीचे डॉट्स असलेली ही रांगोळी खूप छान दिसते आहे, छोट्याश्या जागीही ही रांगोळी शोभून दिसेल.

republic day rangoli idea

मोराचे डिझाईन प्रत्येकाला आपल्या रांगोळीत आवडतात. शिवाय मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ही रांगोळीही काढू शकतात.

republic day rangoli idea

अनेकदा आपल्याला रांगोळी काढायची खूप इच्छा असते पण वेळेचा अभाव असतो, म्हणून ही रांगोळी.. एका पद्धतीने कळी उघडल्या सारखी ही रांगोळी दिसते आहे.

फक्त या रांगोळ्या काढतांना त्या पायाशी येणार नाहीत, कोणाकडून त्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्या, कारण शेवटी त्यात आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT