लाइफस्टाइल

कोकेन, चरस अन् मेफेड्रोन... मोठ्या सेलेब्रेटिंचा 'दम मारो दम'

सकाळ वृत्तसेवा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शनाने चांगलीच खळबळ माजवली. त्यांनतर शनिवारी आणखी एक ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शन समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे हे ड्रग्ज कनेक्शन थेट सुपरस्टार शाहरुख खानपर्यंत पोहचलं आहे. शनिवारी रात्री एनसीबीने क्रूझवर रेव्ह पार्टी चालू असताना मारलेल्या छाप्यात आर्यन खान याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. आर्यनशिवाय आणखी 12 जणांना ताब्यात घेतलं आहे. या पार्टीसाठी जवळापस 600 जणांची उपस्थिती असल्याचेही समोर आली आहे. रेव्ह पार्टीत कोकेन, चरस, मेफेड्रोन, एक्सटसी अशाप्रकारचे ड्रग्स असल्याचेही तपासात उघड झालेय.

कशी असते रेव्ह पार्टी? 

बेहोश करणारं संगीत, निळे अस्पष्ट दिसणारे लाईट, गाण्याच्या तालावर बेधुंद थिरकणारी तरूणाई आणि जोडीला भरपूर ड्रग्ज.... असा माहोल असला की रेव्ह पार्टीत रंगत येते. त्यासाठी  भरपूर पैसे खर्च करण्याची तयारी आणि क्षमता असलेले लोक अश्या पार्ट्या अरेंज करतात. इथे सहभागी होणाऱयांना पाहिजे ती मजा करण्याची मुभा असते. यात खरं आकर्षण असतं ते  कानठळ्या वाजवणारं संगीत आणि त्याच्या जोडीला ड्रग्ज. अनेक ठिकाणी आयोजकच ड्रग्सची व्यवस्था करतात. इथे सेक्स करण्यासाठी ' स्पेशल रुम्स' ची सोयही केलेली असते. ड्रग्ज घेतल्यानंतर काहींच्या बाबतीत डिहायड्रेशन, हायपर होणे असे प्रकार घडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी स्पोर्ट्स ड्रींक, पाण्याची सोय केली जाते. 

या अंमली पदार्थांचा वापर जास्त

भारतात होणार्या रेव्ह पार्ट्यांमध्ये एक्सटसीच्या गोळ्या, किटामाईन, गांजा,कोकेन, हशीश यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यातले काही हे केमिकल लँबमध्ये तयार केले जातात.काही ड्रग्ज घेतल्यावर त्याचा परिणाम 8 तास राहतो. तर कोकेन किती प्रमाणात घेतलंय त्यावर 15 मिनीट ते तासभर त्याची नशा राहते. हे ड्रग्ज घेतल्यानंतर तुम्ही वेगळ्याच धुंदीत जाता. ती धुंदी हवीहवीशी वाटते. जसा पार्टीचा माहोल चढतो तषी ड्रग्जची नशाही चढते. 

भारतात कधी झाली सुरूवात?

 80-90 सालच्या सुमारास जगभरात मोठ्या प्रमाणात रेव्ह पार्ट्यांना सुरूवात झाली. लंडनमध्ये होणाऱ्या नशिल्या पार्ट्यांना रेव म्हटले जाते. भारतात हिप्पींनी गोव्यात अशाप्रकारच्या पार्ट्या सुरू केल्या. त्यांनतर भारतातल्या अनेक शहरांमध्ये अशा पार्ट्या सर्रास केल्या जाऊ लागल्या. हिमालचमधील कुलू हे पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. बंगलोर तर रेव्ह पार्ट्यांचा  हॉटस्पॉट आहे.  तर मुंबई, पुणे ही शहरेही आघाडीवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT