Relationship breakup  Relationship
लाइफस्टाइल

तीन वर्षांतच येतो जोडीदाराचा कंटाळा ?ब्रेकअपची काय आहेत कारणे

एकमेकांबरोबर आयुष्य काढू शकत नाही याचा अंदाज काही परिस्थितीमुळे या काळात येतो

सकाळ डिजिटल टीम

दोघांच्या मूल्य प्रणालीमध्ये झालेल्या तीव्र बदलापासून ते जोडीदारावरील आत्मविश्वासापर्यंत अनेक समस्यांना या कपल्सना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कदाचित ते ब्रेकअप करतात

आजकाल अनेकजण लग्नाआधी रिलेशनशीपमध्ये (Leave In Relationship) राहण्याला प्राधान्य देतात. तेव्हा हृदयाचे (Heart) जास्त एकलं जातं, तेव्हा ती कायम एकत्र राहतील याची खात्री नसते. काही जोडपी (Couples) समजुतदारपणे आपलं नातं (Relationship) पुढे नेतात. तर काहीजण तीन वर्षांच्या डेटींगनंतर (Dating)नाते संपवतात. असे का होते? एकमेकांबरोबर आयुष्य काढू शकत नाही याचा अंदाज काही परिस्थितीमुळे या काळात येतो. दोघांच्या मूल्य प्रणालीमध्ये झालेल्या तीव्र बदलापासून ते जोडीदारावरील आत्मविश्वासापर्यंत अनेक समस्यांना या कपल्सना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कदाचित ते ब्रेकअप करतात. त्यामागे कदाचित ही तीन कारणं असू शकतात.

drink addiction

1) व्यसन आणि अतीखाणे(Addictions and eating disorders)

अल्कोहोलचे व्यसन(Alcohol Addictions, अती खाणे (Food) आणि पदार्थांचा गैरवापर ही कारणं नातेसंबंधात (Relationship) तणाव निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहेत. तुमच्या व्यसनांवर किंवा विकारांवर तुमचे थोडे नियंत्रण असले तरी, तरीही नातेसंबंधात अडचणी निर्माण करण्याची क्षमता त्यात असते. कोणतेही व्यसन नसलेली व्यक्ती जोडीदाराची अधिक काळजी घेते. त्यामुळे तो-ती अधिक जबाबदार वाटतो. पण तुमच्यात व्यसन असेल तर मग नकळत तुमच्याकडून काहीतरी वाईट बोलले जाते. यामुळे मन दुखावून दीर्घकाळ कटुता निर्माण होते. वारंवार मारामारीपासून मूड स्विंग आणि अस्थिर वातावरण निर्माण होऊन तुमच्यात समस्या निर्माण होतात. यामुळे एकमेकांपासून लांब राहणे चांगले वाटू लागते.

couple arguments

2) दुटप्पीपणा (Duplicity)

लॉंग टर्म रीलेशनशीप (Long term relationships ) ही दोघांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासावर आधारलेली असते. त्यामुळे नात्यात फसवणूक झाल्यास दुसऱ्या जोडीदाराला त्रास होतो. फसवणूकीव्यतिरिक्त विश्वासघात केल्याचे दु:ख जास्त असते. त्यामुळे या विश्वासघाताच्या प्रकारांमुळे नातेसंबंधात प्रचंड अडचणी निर्माण होतात. यामुळे तुमच्या मैत्री, काम किंवा घेतलेले कर्ज, एकूण आर्थिक बाबी याविषयी गुप्तता बाळगणे फायद्याचे ठरते.

couple

आयुष्य बदलणाऱ्या घटना (A Life-altering incident)

कधीकधी, आयुष्यात अशा काही घटना घडतात की सरळ मार्गाने चाललेले आयुष्य एकदम ९० अंशात बदलते. त्यामुळे एख वळण येते. अपघात, आजारपण, एखाद्या प्रिय व्यक्तीचे नुकसान किंवा त्यांच्या निवडलेल्या करिअरमध्ये बदल अशा अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत असू शकतात. यामुळे एखाद्यावेळी जोडीदारालाही परिस्थितीमुळे वेगळा मार्ग निवडवा लागू शकतो. साहजिकच तुमच्या नात्यालाही ब्रेक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT