Relationship Crisis
Relationship Crisis sakal
लाइफस्टाइल

Relationship Crisis : तुमचा पार्टनर एक्स बद्दल नेहमी बोलतो? चिडू नका तर असं करा हँडल

सकाळ डिजिटल टीम

Relationship Crisis : कोणतंही नातं म्हटलं की छोटे मोठे वाद विवाद होतातच पण तुमचा पार्टनर नेहमी त्याच्या एक्स विषयी बोलत असेल तर ही नात्यासाठी गंभीर बाब आहे. अशावेळी चिडण्यापेक्षा नात्यातील गुंता सोडवणे, जास्त गरजेचं असतं.

जर तुमचा पार्टनर नेहमी त्याच्या एक्स विषयी बोलत असेल तर अशा वेळी परिस्थिती शांतपणे हँडल करा. तुम्ही चिडला तर तुमचं नातं छोट्याश्या कारणावरुन बिघडूही शकते. त्यामुळे प्रयत्न करा की सयंमाने तुम्ही ही परिस्थिती हँडल करावी. त्यासाठी आम्ही काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Relationship Crisis if your partner always talking about ex a lot try these tips)

  • जोडीदाराचं म्हणणं ऐकूण घेणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी पार्टनरला शेअर करायला कुणी नसतं अशावेळी त्याच्या मनात सुरू असलेली घालमेल तुम्हाला कळत नाही आणि गैरसमज वाढतात अशा वेळी त्यांच्याशी बोला, चर्चा करा. असं केल्याने तुम्हाला त्यांची बाजू समजून घेता येईल.

  • जोडीदार वारंवार एक्सचं नाव घेतो अशावेळी त्याला शांतपणे कारण विचारा पण त्याआधी त्याला खात्री द्या की तुम्ही त्याला जज करणार नाही. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. यामुळे तुमचा पार्टनर का एक्सचं नाव वारंवार घेतोय, याचं कारण सांगेल.

  • पार्टनरशी बोलताना नेहमी मैत्रीच्या नात्याने बोला. त्यामुळे पार्टनर अधिक मनमोकळेपणाने बोलू शकेल. पार्टनर जर त्याच्या एक्स अति जास्त विचार करत असेल तर त्याला कारण विचारताना मदत करण्याचेही आश्वासन द्या ज्यामुळे पार्टनरला वाटेल तुम्ही त्यांना समजून घेताय.

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पार्टनला तुमच्या मनातील घालमेल शेअर करा. जेव्हा पार्टनर त्यांच्या एक्सविषयी बोलतो, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, हे अगदी सोयीस्कर शब्दात त्यांना समजून सांगा.

  • सोबतच त्यांच्या असं एक्स विषयी बोलण्याने तुमच्या नात्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो, हेही त्यांना पटवून द्या. तुम्ही क्लिअर बोलणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला पुढे त्रास होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT