लाइफस्टाइल

Relationship: जोडीदाराच्या जवळ गेल्याने कोरोनाचा वाढतो धोका?

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्ण संख्येमुळे रिलेशनमध्ये लव मेकिंगमध्ये (Love Making)ही संर्सगाचा धोका वाढू शकतो का असा प्रश्न अनेक कपल्सना पडला आहे. शारीरीक जवळीकतेमुळे हा संसर्ग होत नाही असे तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. असे असले तरीही जवळीकता साधताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हीही या संसर्गाच्या कवेत येऊ शकता. यासाठी वेळीच जर दक्षता घेतली तर यापासून सुरुक्षित राहू शकता. शिवाय तुमच वैवाहिक जीवन सुखी करू शकता.

इंटीमेशनपूर्वी या गोष्टीकडे लक्ष द्या

तुम्ही आधीच रिलेशनशिपमध्ये (Relationship)असाल आणि पार्टनरसोबत राहत असाल, तर ठिकाण बदलू नका. तुम्हा दोघांपैकी एकाला जरी कोरोनाचे लक्षण आढळून आले तर दोघांच्यामध्ये अंतर ठेवा. आणि घर आयसोलेट (Isolation) करा.

कोरोनाचे लक्षण आढळल्यास अशी घ्या खबरदारी

तुमचे लग्न झाले असेल आणि तुम्हाला किंवा पार्टनरला (Partner)कोरोना व्हायरसची लक्षणे जाणवत असतील तर, कमीत-कमी दोन मिटराचे अंतर ठेवा. डाॅक्टरांचा सल्ला घेऊन आयसोलेट व्हा. गरज असेल तर हाॅस्पिटलला जावा.

अशा चुका करू नका

तुम्हाला जेव्हा कोरोनाची लक्षणे जाणवतात. अशावेळी नविन लोकांना भेटणे टाळावे. कोरोनाच्या जादा केसेसमध्ये लक्षणे नसतानाही संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या संसर्गाच्या काळात जोडीदार निवडताना काळजी घ्या. हा संसर्ग फक्त इतर लोकच पसरवतील असे नाही तर तुमच्यामुळे देखील हा संसर्ग पसरू शकतो. नकळत जर तुम्ही कोरोना संसर्ग असलेल्या लोकांच्या संपर्कात आला असाल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमची चाचणी (Covid Test)करून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT