Self Care Tips  Sakal
लाइफस्टाइल

Self Care Tips For Mental Health आयुष्यात मित्रमैत्रिणीच नाहीत? मग असे ठेवा स्वतःला आनंदी

Self Care Tips In Marathi स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपल्या आसपास मित्र-मैत्रिणींची गर्दी असावीच, असे काही गरजेचं नाही. याउलट आपण स्वतःच स्वतःला वेगवेगळ्या मार्गांनी खूश ठेवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

आयुष्याच्या खडतर प्रवासात, मैत्रीचे नाते आपल्याला वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जाण्याचे धैर्य देते,  चांगल्या लोकांचा सहवास घडवते आणि महत्त्वाचे म्हणजे जीवनात वेगवेगळे रंग भरण्याची महत्त्वपूर्ण कार्यही बजावते. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात मित्र-मैत्रिणी असतीलच, असे नाही.

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रिणी म्हणून कायम असावी, असे कितीही वाटले तर तुमचं मन त्यांना कळेलच, असे काही गरजेचं नाहीय. पण मंडळींनो ‘अकेले हैं, तो क्या ग़म हैl’ . आयुष्यात मिळणारे आनंदाचे-सुखाचे प्रत्येक क्षण केवळ मित्र-मैत्रिणींच्या संख्येवर अवलंबून असू शकत नाहीत, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. फ्रेंड्स नसले तरीही आपण कित्येक मार्गांनी आयुष्यात वेगवेगळ्या सुखद अनुभवांचे रंग स्वतः भरू शकता. कसे? चला जाणून घेऊया सविस्तर

स्वतःची काळजी घेण्यास सुरुवात करा

स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात करा. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्यावा, पुरेशी झोप घ्यावी आणि मन प्रसन्न ठेवतील असे वेगवेगळे प्रयोग करा व स्वतःला व्यस्त ठेवा. जेव्हा आपण स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देता, तेव्हा तुमचा मूड चांगला राहण्यास मोठी मदत मिळते. प्रसन्न राहण्याकरिता स्वतःचे कॅलेंडर तयार करा आणि ते फॉलो देखील करा.

स्वतःसोबतच डेटवर जा   

स्वतःच स्वतःचे लाड पुरवल्यास तुम्हाला एक अद्भुत भावना अनुभवायला मिळू शकते. स्वतःला वेळ देण्यासाठी प्रत्येक आठवड्यात काही तासांचे ‘सेल्फ टाईम’ वेळापत्रक तयार करावे. नवनवीन ठिकाणांना भेट द्या आणि तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या अक्टिव्हिटीज् अधिकाधिक कराव्यात. शॉपिंग डे आऊट, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये सेल्फ डिनर किंवा लंच डेट प्लान करावी.

छंद जोपासावा

स्वतःला खूश ठेवण्याकरिता आपण एखादा छंद जोपासू शकता. चित्रकला, वाचन, एखादे वाद्य वाजवण्यास शिकणे इत्यादी गोष्टींची छंद आपण जोपासू शकता. एखाद्या छंदामध्ये स्वतःला झोकून दिल्यास तुम्हाला सुखद अनुभव मिळेलच शिवाय तुम्ही एखादी नवीन कला शिकणार आहात, हे महत्त्वाचे. आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी साकारण्यात दिवस घालवणे ही आनंदी, अर्थपूर्ण जीवन जगण्याची गुरूकिल्ली आहे.

एखाद्या संस्थेत सहभागी व्हावे

स्थानिक स्वयंसेवक म्हणूनही आपण कार्य करू शकता. यामुळे तुमची वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांची ओळखही होईल. तसंच स्वयंसेवक म्हणून एखाद्या संस्थेच्या संपर्कात आल्यास नैराश्य, एकटेपणाची भावनही कमी होता. महत्त्वाचे म्हणजे यामुळे स्वतःमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कौशल्यगुणांनाही हक्काचे असे व्यासपीठ मिळू शकते.

महत्त्वाचे म्हणजे स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहिल्यास आपणास उतारवयातही याचे फायदे मिळू शकतात. एखाद्या समाजाकरिता किंवा संस्थेकरिता कार्यरत राहिल्यास तुमच्या बुद्धीला अनेक लाभ मिळतात, अशी माहिती एका संशोधनाद्वारे समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT