Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : पत्नी आई वडिलांचा अनादर करते? तर वेळीच पतीने करावं हे काम

पत्नी आणि आईचे नाते सुधारण्यासाठी या टिप्स करतील मदत

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतर एक मुलगी तिचे घर सोडून दुसऱ्या घरात जाते. आणि प्रेमाने तिथल्या सगळ्यांना सांभाळून घेते. तिचा स्वभाव सगळ्यात मिसळून जाणारा असला तरी सासरच्या मंडळींचा स्वभाव तसा असेलच असे नाही. किंवा परिस्थिती उलटही असू शकते. त्यामूळे घरात काहीच दिवसात कलह सुरू होतात.

नव्या घरात तिला कोणी समजून घेणारं नसेल. तर ती उलट उत्तर द्यायला लागते. सुरूवातीला सहन करणारी ती पुन्ही उलट वागायला लागते. मोठ्यांचा आदर करणे सोडते. सतत माहेरी जाते. कारण तिला सासरी सुरक्षित वाटत नाही.

तूमची पत्नीही अशाच स्वभावाची बनली असेल. तर, तिला सत्याची जाणिव करून देणे आणि पुन्हा शांत करणे केवळ तूम्हालाच शक्य आहे. एक पती म्हणून आई वडील आणि पत्नीला सांभाळून घेणं तूम्हालाच जमू शकतं. कारण, या दोन्ही गटातील तूम्हीच मध्यस्थी आहात. त्यामूळे या परिस्थितीला कसे डिल करायचे ते पाहुयात

कारण समजून घ्या

जर तूमची पत्नी तूमच्या आई वडिलांचा आदर करत नाही. ती त्यांच्यावर चिडचिड करते. किंवा त्यांना उलट बोलते तर तिच्या या भुमिकेबद्दल काय कारण आहे हे समजून घ्या. त्यामुळेच त्या प्रसंगाशी डिल करणं सोप्प होईल

पत्नी आणि आईला समान वागणूक द्या पत्नी किंवा आई वडील यांना समान वागणूक द्या. त्या दोघांच्या बाबतील न्युट्रल रहा. कधीच कोणा एकाची बाजू घेऊ नका. जर तूम्ही कोणा एकाची बाजू घेतलीत तर दुसरी पार्टी नक्कीच तूमच्यावर चिडणार, त्यामूळे स्पष्टपणे कोणाचीच बाजू घेऊ नका.  

सतत पत्नीला दोषी ठरवू नका

लग्नानंतर पत्नी केवळ तूमचा हात धरून या घरात आलेली असते. तिला तूमचाच आधार असतो. त्यामूळे नेहमी तिचाच दोष आहे असे समजू नका. दोन्हीकडच्या बाजू ऐकून घेऊन मगच निर्णयापर्यंत पोहोचा.    

पत्नीच्या आई वडिलांचा आदर करा

पत्नी जरी तूमच्या आई वडिलांचे ऐकत नसेल. त्यांना दोष देत असेल तरी तूम्ही तसे वागू नका. तिच्या आई वडिलांचा तूम्ही कधीही अनादर करू नका. यामूळेही पत्नीचे मन परिवर्तन होईल आणि ती तूमच्या आई वडिलांसोबत चांगली वागेल.  

पत्नी आणि आईला एकत्र आणा

घरात वाद झाले की सगळ्यांचे मुड ऑफ असतात. त्यामूळे कोणी कोणाशी बोलत नाही. जेवणावरही राग निघतो त्यावेळी घरातल्या सगळ्या सदस्यांसोबत एकत्र जेवणाचा प्लॅन करा. किंवा घरातच काहीतरी स्पेशल प्लॅन करा. घरातले वातावरण शांत राहिल यासाठी प्रयत्न करा.         

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT