Tips to Recover From a Breakup sakal
लाइफस्टाइल

Breakup: ब्रेकअपनंतरही येतीये जोडीदाराची आठवण? फॉलो करा या टिप्स

Tips for Life after Breakup: तुम्हाला ब्रेकअपनंतरही तुमचा प्रियकर/प्रेयसी आठवत असेल आणि ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडणे कठीण जात असेल तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Life After Breakup: प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे. जिथं प्रेम आहे, तिथं आनंद असतोच. प्रेमानंच जगातल्या अनेक गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. आजकाल लोक जितक्या सहजतेने नात्यात येतात परंतु तितकेच नातं लवकर तुटते देखील. ब्रेकअप (Breakup), घटस्फोट (Divorce) इत्यादी गोष्टी अलीकडच्या काळात सामान्य झाल्या आहेत. गैरसमज, राग किंवा इतर कारणांमुळे नात्यात (Relationship) असताना अनेकदा भांडणं होत असतात आणि हेच नातं संपण्याचं कारण ठरतं. ब्रेकअपमधून सावरणं इतकं सोपं नसतं. जर तुम्हाला ब्रेकअपनंतरही तुमचा प्रियकर/प्रेयसी आठवत असेल आणि ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडणे कठीण जात असेल तर या सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता. (Tips to Recover From a Breakup)

1. स्वतःला वेळ द्यावा (Give yourself time)-

जोडीदारासोबत घालवला वेळ, त्याच्याबरोबरच्या आढवणी सतत डोळ्यासमोर येत असतात. अशा परिस्थितीत तुम्हाला नवी सुरुवात करायची असते. पण तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी आणि लोक तुम्हाला कळत नकळत तुमच्या जोडीदाराबद्दल विचार करायला लावतात आणि त्यामुळे ब्रेकअपच्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी अनेक वर्षे लागतात.

2. स्वत: मध्ये व्यस्त राहणे (Engage in yourself)-

ब्रेकअपनंतर तुमच्या तुटलेल्या नात्याबद्दल आणि जोडीदाराबद्दल विचार करणे थांबवा. हे करणे अवघड आहे पण अशक्य नाही. स्वतःला व्यस्त ठेवा. इतर गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा. यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल आणि तुम्ही तुमच्या तुटलेल्या नात्याच्या आठवणीतून बाहेर पडाल.

3. बदल आवश्यक (Change Required)-

जेव्हा तुम्ही दीर्घकाळ नातेसंबंधात असता तेव्हा तुमचे आयुष्य तुमच्या जोडीदाराभोवती फिरू लागते. उदाहरणार्थ, जोडीदाराची निवड स्वीकारणे, एकमेकांनुसार दिनचर्या करणे. पण ब्रेकअपनंतर तुम्हाला या सवयी सोडाव्या लागतील आणि तुमच्या आवडी-निवडी आणि रुटीन तुमच्यानुसार ठरवावे लागेल. याशिवाय, तुमच्याकडे नात्यात असताना तुमच्या जोडीदारानं तुम्हाला अनेक गोष्टी तसेच भेटवस्तू दिल्या असतील. तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असेल तर या गोष्टी स्वतःपासून दूर करा.

4. कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या (Give time to family and friends)-

ब्रेकअपनंतर लोक एकटे राहू लागतात. त्यांना असे वाटते की, त्याच्या तुटलेल्या नात्याबद्दल ते मित्र किंवा कुटुंबाशी बोलू शकत नाही. ते ही स्वतःची चूक समजू लागतात, परंतु अशा वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत असणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा. पिकनिक किंवा सहलीची योजना करा आणि तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी बाहेर जा.

5. जीवनात नाविण्य आणा (Bring innovation to life)-

जेव्हा तुमच्या आयुष्यात काही नवीन घडते, तेव्हा तुम्ही त्याबद्दल उत्सुक असता. ब्रेकअपनंतर या तर्काचा अवलंब करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. जसे काहीतरी नवीन शिका. तुमच्या आवडीनुसार नवीन कौशल्य, प्रशिक्षण किंवा कोर्समध्ये सामील व्हा. यामुळे भविष्यातही फायदा होईल आणि जीवनात जिज्ञासा वाढेल. नाविण्य म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या नात्यात जाणे असं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT