Parenting Tips  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : धक्कादायक ! I Q वगैरे असलं काही नसतं, वाचा काय सांगतो रिसर्च

हल्ली पालक मुलांच्या लहान वयातच त्यांची कल चाचणी, आयक्यू टेस्ट करतात. त्यानुसार आतापासून कसं प्लॅनिंग करायचं हे ठरवतात.

सकाळ डिजिटल टीम

Research Says I Q Test Is A Myth : आपलं मुल हुशार व्हावं, या स्पर्धेच्या जगात चमकावं या गोष्टीचा ताण पालकांवरच एवढा असतो की, ते नकळत तो आपल्या मुलांवर लादतात. पूर्वीच्या काळी मुलांना एकदा शाळेत घातलं की, १०-१२ वी पर्यंत टेंशन नाही. मग कोणत्या शाखेत घालायचं ते ठरवूया असं होतं. पण हल्ली पालक मुलांच्या लहान वयातच त्यांची कल चाचणी, आयक्यू टेस्ट करतात. त्यानुसार आतापासून कसं प्लॅनिंग करायचं हे ठरवतात. पण मेंदू विषयी झालेल्या संशोधनांतून हे सिध्द झालं आहे की, आय क्यू वगैरे काही नसतं. ते एक मिथ आहे.

याविषयी पॅरेंटींग कोच शिल्पा इनामदार यज्ञोपवीत यांच्या सेल्फलेस पॅरेंटींग या पॉडकास्टमध्ये याविषयावर त्यांनी क्वालिटी फॉर इक्वॅलिटी हे ब्रीद असणारं नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या संचालिका गिता महाशब्दे यांच्याशी संवाद साधला. ही संस्था ऑल इंडीया पिपल्स सायन्स ची सदस्य आहे. ते गणित आणि विज्ञान विषयाचा फोबिया भीती घालवण्यासाठी काम करते.

या संदर्भात मार्गदर्शन करताना महाशब्दे म्हणाल्या, प्रत्येक पालकाला वाटतं की आपलं मुल हुशार व्हावं. आणि ती इच्छा अगदी बरोबर आहे. पण मुल सुदृढ व्हावं असं वाटतं तेव्हा आपण त्याला रोज जंक फूड खायला देत नाही. तसंच आज बाजारात असंख्य जंक गोष्टी पालकांच्या माथी मारल्या जातात आणि तुमचं मुल हुशार हाईल असं एक गाजर ते वापरतात. आपलं मुल हुशार व्हावं या पालकांच्या सच्च्या भावनेचा फायदा उचलत नफा साधणारे अनेक प्रॉडक्ट बाजारात आले आहेत. त्यामुळे पालकांनी हे ओळखायला हवं की, जंक काय आणि अस्सल काय?

अस्सल काय हे शोधायचं कसं हे माहित असायला हवं.

  • व्हर्च्युअल हे कधीच अ‍ॅक्च्युअलला रिप्लेस नाही करू शकत.

  • स्क्रीन वरचं चित्र माउसच्या माध्यमातून रंगवणं व्हर्च्युअल झालं. आणि स्वतः हात बरबटून रंगवणं हे प्रत्यक्ष झालं.

  • स्क्रीन वरच्या अनुभवात सखोल अनुभव नसतो. सखोलतेचा अनुभव अस्सलतेतूनच प्रॅक्टिकल गोष्टींतून येतो.

  • प्रत्यक्ष कृती करताना आपली सगळी ज्ञानेंद्रिय आणि मेंदू एकत्र काम करत असतात.

  • हात चालतात तेंव्हा मेंदू चालतो. मेंदू चालतो तेव्हा त्याचा विकास होतो. त्यामुळे हे तत्व वापरुन पालकांनी मुलांची बुद्धीमत्ता वाढवण्यावर भर द्यावा.

मेंदू वरचं आधुनिक संशोधन काय सांगतं?

  • हे गेल्या २० वर्षातलं संशोधन आहे.

  • जसं आपल्या डोळ्यांचा रंग किंवा दिसण्याची ठेवण घेऊन जन्माला येतो. तसा काही बुध्दीमत्तेचा एक आकडा घेऊन जन्माला येत नाही.

  • तर मेंदू हा इतर कोणत्याही स्नायू सारखा आहे. म्हणजे जीममध्ये जाऊन जशी बॉडी कमवता येते, तसंच कोणत्याही वयात मेंदूच्या योग्य व्यायामांनी बुध्दी कमवता किंवा वाढवता येते.

  • मुलांचा इंटेलिजंस वाढवता येतो.

  • आय क्यू हे मिथ आहे किंवा उगाच केलेला बागुलबुवा आहे हे आजवरच्या संशोधनांनी सिध्द केलेलं आहे.

  • मुलं जेव्हा स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेत तेव्हा त्यांच्या मेंदूत न्युरॉनच्या वेगवेगळ्या जोडण्या होतात. जेव्हा मुलं अनुभव घेतात, चुका करतात, त्यावर विचार करतात तेव्हा त्या जोडण्या जास्तीत जास्त होत जातात.

  • जेवढ्या या न्युरॉनच्या जोडण्या जास्त तितकं मुल चमकदार म्हणजेच हुशार होत असतं.

  • त्यासाठी मुलांनी स्वतः आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं आवश्यक असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT