Sakal Digital 2.0
Sakal Digital 2.0
लाइफस्टाइल

Risk Of Heart Attack : हृदयविकाराचा झटका याच दिवशी जास्त येतो, संशोधकांचा दावा!

Pooja Karande-Kadam

Risk Of Heart Attack : आजकालच्या जीनशैलीत हृदयविकार (Heart disease) खूप कॉमन झाले आहेत. पुरुषांबद्दल बोलायचे झाल्यास 30 ते 35 वयोगटातील पुरुषांमध्येही हृदयविकाराचा झटका येणं, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात.

उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी, अति धूम्रपान, खराब जीवनशैली, वय, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी हृदयविकाराचे मुख्य जोखीम घटक आहेत.

हृदयविकाराचा झटका ही आजच्या काळात सर्वात सामान्य आरोग्य समस्या बनली आहे. ही समस्या कोणत्याही व्यक्तीला कधीही होऊ शकते. याबाबत अनेक प्रकारचे संशोधनही झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे.

आठवड्यातील कोणत्या दिवशी हृदयविकाराचा धोका जास्त असतो, असे संशोधनातून समोर आले आहे. या दिवशी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच सोमवार हा हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित आहे.

संशोधनानुसार, या सोमवारी दिवशी हृदयविकाराच्या सर्वाधिक रुग्ण आढळतात. हे संशोधन यूकेमधील मँचेस्टर येथे ब्रिटिश कार्डिओव्हस्कुलर सोसायटी (BCS) परिषदेत सादर करण्यात आले. बेलफास्ट हेल्थ अँड सोशल केअर ट्रस्ट आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन ऑफ आयर्लंडच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

संशोधनादरम्यान 20 हजारांहून अधिक रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. 2013 ते 2018 या कालावधीत आयर्लंडमध्ये ही प्रकरणे नोंदवली गेली.

या दिवशी धोका का वाढतो?

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जॅक लॅफन यांनी अभ्यासाच्या निष्कर्षांचा हवाला देत सांगितले की, हे केवळ सोमवारीच का घडते हे स्पष्ट नाही, पण आमचा विश्वास आहे. याचा सर्कॅडियन लयशी काहीतरी संबंध आहे, ज्यामुळे रक्ताभिसरण संप्रेरकांवर परिणाम होतो, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता वाढते.

संशोधनादरम्यान हिवाळ्यात आणि सकाळी हृदयविकाराच्या झटक्यामध्ये असे बदल दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, सोमवारी ऑफिसला जाण्याचाही ताण असतो. ताण वाढल्याने शरीरातील कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते.

ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. संशोधनात बहुतांश रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसली, एसटी एलिव्हेटेड मायोकार्डियल इन्फ्रक्शन (एसटीईएमआय) दिसला. जो एक गंभीर प्रकार आहे.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

संशोधनात, बहुतेक रुग्णांमध्ये एसटी एलिव्हेटेड मायोकार्डियल इन्फेक्शन (एसटीईएमआय) दिसून आले, हा हृदयविकाराचा गंभीर प्रकार आहे. संशोधनात, सोमवारी STEMI चे प्रकरण अधिक आढळले. STEMI मध्ये, एक प्रमुख कोरोनरी धमनी पूर्णपणे अवरोधित केली जाते, ज्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा बंद होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT