skin sakal
लाइफस्टाइल

Spotless Skin हवीये? मग गुलाब पाण्यात मिक्स करून लावा या 2 गोष्टी

उन्हाळ्यात गुलाबपाणी आपली त्वचा हायड्रेट ठेवते.

Aishwarya Musale

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की गुलाब पाणी हे एक सौंदर्य उत्पादन आहे जे प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी समाविष्ट केले गेले आहे. गुलाब पाणी हे परवडणारे तसेच त्वचेसाठी बेस्ट आहे. आज आम्ही तुमच्यासाठी स्पॉटलेस स्किन फेसपॅक बनवण्याची एक पद्धत घेऊन आलो आहोत.

गुलाबपाणी आपली त्वचा उन्हाळ्यात हायड्रेट ठेवते. तुमची त्वचा यामुळे मुलायम राहते. आपल्या त्वचेवरील या फेसपॅकच्या वापराने मुरुम, गडद डाग किंवा पिग्मेंटेशन सारखे डाग पूर्णपणे गायब होऊ लागतात. एवढंच नाही तर आपल्या त्वचेवरील डेड स्किन आणि साचलेली घाण काढून टाकण्यास देखील मदत करते.

फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ चमचा गुलाब पाणी

  • १ चमचा संत्र्याची साल पावडर

  • १ चमचा मध

फेस पॅक कसा बनवावा?

  • सगळ्यात पाहिलं स्पॉटलेस स्किन फेसपॅक तयार करण्यासाठी, एक छोटी वाटी घ्या.

  • त्यानंतर त्यामध्ये १ चमचा गुलाबजल, संत्र्याची साल पावडर आणि १ चमचा मध घाला.

  • तुम्ही या सर्व गोष्टी यानंतर व्यवस्थित मिसळा.

  • आता स्पॉटलेस स्किन फेसपॅक तयार आहे.

स्पॉटलेस स्किन फेसपॅक कसा लावावा?

  • फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा पहिलं धुवा.

  • त्यानंतर तयार फेसपॅकचा थोडासा भाग बोटावर घेऊन चेहऱ्यावर लावा.

  • यानंतर पॅक चांगले कोरडे होण्यासाठी थोडावेळ सोडा.

  • नॉर्मल पाण्याने नंतर चेहरा धुवून स्वच्छ करावा.

  • यानंतर चेहऱ्यावर एलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावा.

  • आठवड्यातून 3 वेळा सकाळी आणि संध्याकाळी हा पॅक लावा.

  • तुमच्या त्वचेवरील डाग यामुळे कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

SCROLL FOR NEXT