Shweta Tiwari Diet esakal
लाइफस्टाइल

Shweta Tiwari Diet: श्वेता तिवारी दिवसातून एकदा जेवते; तिच्या ट्रेनरने सांगितला तिचा वेट लॉस डाएट

श्वेताचा फिटनेस बघून इतर महिलांनाही तिचा डाएट जाणून घेण्याची उत्सकता लागली आहे

सकाळ डिजिटल टीम

Shweta Tiwari Diet: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटोज बघतच राहावे असे चाहत्यांना वाटते. श्वेताचं वय ४२ वर्ष असलं तरी तिच्या मुलीप्रमाणेच ती तरुण दिसते. तिचं फिटनेस बघून इतर महिलांनाही तिचा डाएट जाणून घेण्यास उत्सकता लागली आहे. चला तर जाणून घेऊया श्वेताचा डाएट प्लान.

काही काळापूर्वी श्वेता तिवारीचं वजन चांगलंच वाढलेलं होतं. त्यानंतर मात्र तिने वजन कमी करत सिक्स पॅक्सही बनवलेत. अलीकडेच श्वेताच्या पर्सनल फिटनेस ट्रेनर आणि सेलिब्रिटी कोच नंदकुमार शिर्केने श्वेताचं डाएट आणि वर्कआउट रूटीन शेअर केलंय.

श्वेता तिचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी दिवसातून एकदा सॉलिड मील खाते. सॉलिड मिलमध्ये १०० ग्रॅम चिकन किंवा मासे, २००-३०० ग्रॅम व्हेजिटेबल आणि ज्वारीची एक पोळी खाते. सॅलेट नसल्यास ती १०० ग्रॅम पालक किंवा मेथीची भाजी खाते. याशिवाय ती सकाळी ब्रेकफास्टमध्ये ९० ग्रॅम ग्रीक योगर्ट आणि ८-१० बदाम खाते. संध्याकाळी ती एक संत्र आणि एक कप डिटॉक्स टी घेते. (Diet Plan)

श्वेता तिवारी रोज आहारात हजार कॅलरी घेते. तिच्या उंचीनुसार तिचे वजन अगदी नियंत्रणात आहे. श्वेता आठवड्यातून फक्त तीन वेळा वर्कआउट करते. श्वेताने जवळपास १० किलो वजन ६ महिन्यात कमी केलेय. त्यासाठी ती ५ आठवडे वर्कआउट करायची तर एक दिवस इंटेस वर्कआउट करायची.

श्वेता आहारात काय काय घेते?

श्वेताच्या डाएटमध्ये घरी बनवलेली पोळी, हिरव्या पालेभाज्या उदा. पालक, टमाटर,लेट्युस असते. तसेच ती अंडी, ब्राउन ब्रेड आणि चहाही घेते. लंच ब्रेकमध्ये पनीर भूर्जी किंवा चिकन, दही आणि पोळी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

Pune Railway Station : दिवाळीत ३५ लाख नागरिकांचा रेल्वे प्रवास; पुण्यातून धावल्या नियमित अन्‌ विशेष ११०० गाड्या

SCROLL FOR NEXT