Office esakal
लाइफस्टाइल

ऑफिसमध्ये तासन्-तास बसणं महिलांसाठी धोक्याच

अनेकांना आपल्या कामासाठी तासनतास एकाच जागेवर समोर बसावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

लोकांना आपल्या कामासाठी तासनतास एकाच जागेवर समोर बसावे लागते.

आजकाल ऑफिसमध्ये सर्व काही लॅपटॉप (Laptop) किंवा संगणकाद्वारे (Computer) केले जात आहे. अशा परिस्थितीत लोकांना आपल्या कामासाठी तासनतास एकाच जागेवर समोर बसावे लागते. पण ते किती धोकादायक असू शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामुळे विशेषतः महिलांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. ऑफिसमध्ये (Office) जास्त वेळ बसून राहण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात.

अशक्तपणा (Weakness)

क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया) विद्यापीठातील (University of Queensland) संशोधकांना असे आढळून आले आहे की, ज्या महिला ऑफिसमध्ये दिवसांतून जवळपास 10 तास एका जागेवर बसतात, त्यांना थकवा (Fatigue) येण्याची शक्यता अधिक असते. 12 वर्षांपासून हे संशोधक महिलांच्या एका जागेवर बसण्याच्या सवयींचा अभ्यास करत आहेत.

प्रतिकारशक्ती (Immunity) कमी होणे

आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकार शक्ती (Immunity) खूप महत्वाची आहे आणि आरोग्याच्या समस्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्यांमधून बरे होण्याची शक्ती प्रदान करण्यासाठी आपल्या सर्वांना चांगली रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक आहे, परंतु एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते. महिलांनी त्यांच्या दीर्घ कामाच्या तासांच्या दरम्यान काही अॅक्टिव्हिटी (Activity) करत राहायला हवे.

साइड इफेक्ट्सपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे

- जास्त वेळ खुर्चीवर न बसण्याचा प्रयत्न करा.

- दर काही तासांनी ऑफिसमध्ये फिरा

- काही गोष्टींवर काम करताना उभे राहण्याचा प्रयत्न करा

- तुमचे दुपारचे जेवण तुमच्या जागेवर नव्हे तर कॅन्टीनमध्ये करा

- अधूनमधून मान आणि खांद्यांना स्ट्रेच करा

- फ्रेश हवेसाठी बाहेर फिरायला जा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT