Signs of Pregnancy esakal
लाइफस्टाइल

Signs of Pregnancy : पाळीची तारीख चुकण्याआधीच ही लक्षणे देतात 'Good news' ची चाहुल

ही लक्षणे दिसलीत तर समजून जा 'कुणीतरी येणार गं'

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक महिलेसाठी आपण आई होणार आहोत. हे समजणे हा अत्यंत खास क्षण असतो. महिण्याला येणारी पाळी चुकली की आधी वाट पाहतात आणि मग प्रेग्नंसी टेस्ट करतात. पण, बऱ्याचदा पाळी चुकल्यानंतरही प्रेग्नंसी आहे की नाही हे कळत नाही. त्यामूळे गर्भवती असण्याची लक्षणे काय आहेत? हे जाणून घेणे गरजेचे आहे.

महिन्याला येणारी पाळी अर्थात मासिक पाळी चुकली की मनात शंकेची पाल चुकचुकते आणि मग आपण प्रेग्नंट अर्थात गरोदर तर नाही ना?. हाच मनात पहिला विचार येतो. साधारणतः तारीख चुकून महिना झाला असेल तर गरोदर असल्याचे लक्षण समजण्यात येते.

मासिक पाळी चुकण्यापूर्वीदेखील आपण गरोदर आहोत की नाही याबाबत कसे समजून घ्यायचे असाही अनेकांना प्रश्न पडतो.  अनेक महिलांना ज्या महिलांना PCOD सारख्या समस्या असतात त्यांना मासिक पाळीच्या अनियमितपणामुळे आपण गरोदर आहोत की नाही हे कळत नाही.

त्यामूळेच पाळी चुकण्याआधीच काही गोष्टी लक्षात घेतल्या. तर आपल्या लक्षात येऊ शकतं की तूम्ही प्रेग्नंट आहात की नाही. जगातील ९० टक्के महिलांच्या शरीरात गर्भधारणा झाल्यानंतर लगेचच बदल व्हायला लागतात. त्या बदलांवरूनच एखाद्या अनोळखी लोकही तूम्ही प्रेग्नंट आहात हे ओळखी शकतात.  

स्त्राव होणे

जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. यामुळे योनीची भिंत जाड होते. त्यामुळे योनीच्या पेशींची वाढ वेगाने होऊ लागते. थोडासा स्त्राव होऊ शकतो. यासोबत च योनिमार्गात दुखणे, जळजळ किंवा वास येत असल्यास डॉक्टरांना दाखवावे. हे संसर्गाचे लक्षण असू शकते.

दुखरे स्तन

जेव्हा एखादी स्त्रीची गर्भधारणा होते तेव्हा स्तनामध्येही अनेक बदल जाणवतात. स्तनामध्ये जडपणा, मुंग्या येणे किंवा स्पर्श केल्यावर वेदना देखील होऊ शकतात. अशावेळी घाबरून न जाता प्राथमिक अंदाज म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

 सततचा थकवा

अनेक महिलांना सुरूवातीच्या दिवसांत थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा जाणवतो. गर्भधारणेनंतर सुरूवातीच्या काळात थकवा येऊ लागतो. दिवसाची सुरूवातच करावीशी वाटत नाही. जास्त वेळ झोपावं असं वाटतं.

मॉर्निंग सिकनेस 

मॉर्निंग सिकनेस हे अतिशय सामान्य लक्षणं आहे. पहिली पाळी चुकण्याच्या काही दिवस आधी हे लक्षण दिसून येते. मॉर्निंग सिकनेस काही स्त्रियांना सकाळी ऐवजी दुपारी किंवा संध्याकाळी येऊ शकतो. यामध्ये उलट्या होणे, मळमळ होणे किंवा भाजीचा वास सहन न होणे, ही लक्षणे दिसू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT