skin care sakal
लाइफस्टाइल

Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर

आपले शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे.

Aishwarya Musale

आजकाल बहुतेक लोक साबण किंवा बॉडी वॉश यापैकी काय वापरायचे याबद्दल कन्फयुज असतात. या दोन उत्पादनांपैकी कोणते प्रोडक्ट आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरतील? काही लोक जास्त साबण वापरतात, तर काही लोक बॉडी वॉश वापरतात.

साबण त्वचेवर साचलेली घाण साफ करण्याचेही काम करते आणि बॉडी वॉशमुळे शरीरावर साचलेली अशुद्धताही साफ होते. साबण आणि बॉडी वॉश यात काय चांगले आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

साबण

आजही लोक साबणच वापरतात. ते फक्त अंघोळ करताना किंवा हात धुताना साबण वापरतात. साबण वापरण्यामागचे एक कारण म्हणजे त्याचा सुगंध तीव्र असतो, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ ताजेतवाने वाटू शकते. पण अनेक वेळा साबणाच्या अतिवापरामुळे त्वचा कोरडी होते.

बाथिंग सोपमध्ये सोडियम लॉरील सल्फेट नावाचे रसायन असते, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते. साबणाच्या अतिवापरामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. याशिवाय, साबण कमी स्वच्छ मानला जातो कारण तो उघडा राहतो, जो अनेक जीवाणूंच्या संपर्कात येऊ शकतो.

बॉडी वॉश

मात्र, साबणासोबतच लोक बॉडी वॉशचाही वापर करत आहेत. साबणापेक्षा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. बॉडी वॉशमध्ये साबणापेक्षा चांगली पीएच पातळी असते. याशिवाय यात साबणापेक्षा जास्त मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील आहेत.

बॉडी वॉश कधी वापरावे

आंघोळीनंतर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही साबणाऐवजी बॉडी वॉशचा वापर सुरू करा. ते त्वचेला आर्द्रता देते. दुसरीकडे, जर तुम्हाला सोरायसिस किंवा मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही माईल्ड बॉडी वॉश देखील वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT