Skin Care tips for winters
Skin Care tips for winters esakal
लाइफस्टाइल

Skin Care :  लोकरीच्या उबदार कपड्यांमुळेही होते ऍलर्जी, अशी घ्या काळजी!

Pooja Karande-Kadam

Skin Care :  

त्वचेची ऍलर्जी फक्त उन्हाळ्यातच होते असे नाही. हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमुळे ऍलर्जी होते. काही दिवसांपूर्वी, जेव्हा मी लोकरीचे कपडे घालायला सुरुवात केली तेव्हा मला त्वचेची ऍलर्जी झाली. मला आधी वाटलं की हे काहीतरी वेगळं असेल. पण, फक्त स्वेटर घातल्यावरच अंगाला खाज उठायची तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की, स्वेटरसारख्या वुलनच्या कापडामुळे ही ऍलर्जी होत आहे.

जेव्हा लाल पुरळ आणि हात-पायांवर खाज कमी येण्याचं नाव घेत नव्हती. तेव्हा मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी मला सांगितले की ही लोकर ऍलर्जीची लक्षणे आहेत. अनेकांना लोकरीच्या कपड्यांची अॅलर्जी असते.

लोकरीचे कपडे हिवाळ्यात थंडीपासून तुमचे संरक्षण करतात, पण त्यामुळे होणारी अॅलर्जी टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांची मदत घेऊ शकता. याबद्दलच डॉ. देवेश मिश्रा, वरिष्ठ सल्लागार त्वचाशास्त्रज्ञ, लखनऊ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

कोल्ड क्रीम लावा

लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी कोल्ड क्रीम लावावे. अशा प्रकारे त्वचा कोरडी होणार नाही आणि ऍलर्जीचा धोका कमी होईल. थंडीच्या दिवसात त्वचेची आर्द्रता कमी होते. त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी क्रीम लावायला विसरू नका. केवळ चेहरा आणि मानेवर क्रीम लावणे पुरेसे नाही, तर संपूर्ण शरीर मॉइश्चरायझेशन केले पाहिजे.   

तुम्ही वापरत असेलली क्रिम त्वचेला सूट होणारी असावी. कारण, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते त्यावर तुम्ही प्रत्येकवेळा स्वेटर घालताना क्रीमचा वापर करणार आहात. तर अशावेळी त्या क्रिममुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही ना, याची काळजी घ्या.

हिवाळ्यात तेल मालिश

हिवाळ्यात तेलाच्या मसाजमुळे त्वचेला पुरेसे पोषण मिळते आणि त्वचा कोरडी होण्यापासून वाचते. तुम्ही ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल आणि खोबरेल तेल इत्यादी वापरू शकता. त्वचेवर कोमट तेल लावल्याने खाज सुटणे आणि पुरळ येण्यापासून बचाव होतो. त्यामुळे लोकरीची ऍलर्जी टाळण्यासाठी तेलाचा मसाज करावा.

लोकरीचे कपडे थेट अंगावर घालणे टाळा

लोकरीची ऍलर्जी टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकरीच्या कपड्यांशी थेट संपर्क टाळणे. लोकरीच्या कपड्यांचा त्वचेशी थेट संपर्क टाळण्यासाठी आधी साधेच पण सुती कपडे घाला. ज्यामुळे तुमची त्वचा संपूर्ण कव्हर होईल. त्यावर हे कपडे घाला.

थंडीच्या दिवसातही त्वचेला घाम येतो. तो घाम शोषून घेण्यासाठी सूती कपड्यांची मदत होईल. जेव्हा घामाचा लोकरी कपड्यांशी संपर्क येतो तेव्हा संसर्ग होतो, त्यामुळे आतमध्ये लोकरीचे कपडे घालण्याऐवजी वर उबदार कपडे घाला आणि आत सुती शर्ट किंवा इतर कॉटन फॅब्रिकचे कपडे घालू शकता.               

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT