smartphone virus prevention tips
esakal
तुमचा स्मार्टफोन अचानक विचित्र वागू लागलाय का? जर तुमच्या फोनमध्ये खालील ३ महत्त्वाचे बदल दिसून येत असतील तर सावध व्हा कारण तुमच्या डिव्हाइसमध्ये धोकादायक व्हायरस किंवा मालवेअरची एन्ट्री झालेली असू शकते. वेळेत लक्ष न दिल्यास तुमचा पर्सनल डेटा आणि बँक खात्याची माहिती चोरीला जाऊ शकते.
जर तुमच्या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज असूनही काही तासांतच संपत असेल तर हे व्हायरसचे प्रमुख लक्षण आहे. व्हायरस बॅकग्राउंडमध्ये सतत सक्रिय राहून प्रोसेसिंग पॉवर वापरतात. ज्यामुळे कोणताही हेवी वापर नसतानाही फोन प्रचंड गरम होतो. अशा वेळी सेटिंगमध्ये जाऊन बॅटरीचा वापर तपासा जर एखादे अनोळखी ॲप जास्त बॅटरी वापरत असेल तर ते तत्काळ काढून टाका.
इंटरनेट बंद असताना किंवा होम स्क्रीनवर असतानाही जर तुम्हाला वारंवार विचित्र जाहिराती किंवा पॉपअप्स दिसत असतील तर तुमच्या फोनमध्ये ॲडवेअर शिरले आहे. हे व्हायरस केवळ जाहिराती दाखवत नाहीत, तर तुमच्या नकळत काही धोकादायक लिंक्सवर क्लिक करून घेतात. तसेच, तुमच्या फोनमध्ये तुम्ही इन्स्टॉल न केलेले अनोळखी ॲप्स दिसू लागले तर तो मोठा धोक्याचा इशारा समजावा.
तुमचा इंटरनेट डेटा नेहमीपेक्षा जास्त वेगाने संपत असेल तर व्हायरस तुमच्या फोनमधील माहिती बाहेरील सर्व्हरवर पाठवत असण्याची शक्यता असते. याशिवाय, कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना तुमच्या नकळत मेसेज जाणे किंवा सोशल मीडिया अकाउंटवरून आपोआप पोस्ट होणे हे हॅकिंगचे संकेत आहेत. हे टाळण्यासाठी फोनमधील महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेऊन फोन 'फॅक्टरी रिसेट' करणे हा सर्वात उत्तम उपाय ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.