Successful Parenting Tips
Successful Parenting Tips  esakal
लाइफस्टाइल

Successful Parenting Tips : आदर्श पालकांमध्ये आढळतात या 3 गोष्टी; तुम्हीही करा या गोष्टींचे अवलंबन

सकाळ डिजिटल टीम

Successful Parenting Tips : मुलांचे संगोपन ही खूप मोठी जबाबदारी असते. सगळेच पालक आपल्या मुलांना त्यांना न मिळालेली प्रत्येक गोष्ट देण्याचे प्रयत्न करत असतात. त्यांना चांगली जीवनशैली मिळावी यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात.

पण मुलांना हवं ते देणं म्हणजे आपण चांगले पालक होत नाही. मुलं त्यांच्या आयुष्यात किती संयमी, शांत, अभ्यासू आहेत यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात. अनेकदा लोकं म्हणतात की मुलं आपल्या नजरेच्या धाकात हवी; पण धाक असणं वेगळं आणि भीती वाटणं वेगळं.

आजकालच्या जगात मुलांच्या मनात घरातलं वातावरण भीतीदायक असणं धोक्याच आहे त्यामुळे नक्की मुलांशी कसं वागावं, त्यांना शिस्त कशी लावावी हे प्रश्न सगळ्यांनाच असतात. शिवाय त्यांचं कसं संगोपन करावं ज्याने ते आपल्या क्षेत्रात योग्य प्रगती करतील हाही प्रश्न असतो.

ज्या पालकांची मुलं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी असतात त्यांच्यामध्ये हे तीन गुण आढळतात.

1. आपल्या मुलांबाबत संवेदनशील रहा. त्यांच्याशी सहानुभूतीने वागा, कोणतीही परिस्थिती असली तरी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहा. तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ही एक गोष्ट त्यांना खूप जास्त उभारी देते. पालकांनी आपल्या मुलांना वेळोवेळी विचारले पाहिजे की त्यांना कसे वाटत आहे, त्यांना कोणत्याही गोष्टीची चिंता आहे का, त्यांना हा विश्वास दिला पाहिजे की काहीही झालं तरी आम्ही आहोत तुझ्यासोबत.

2. मुलांच्या आवडीनिवडी जोपासा, त्यात रस घ्या, त्यांना जी कला जोपाविशी वाटते आहे तिला प्रोत्साहन द्या, जर त्यांचा कल हा अभ्यासापेक्षा कलेवर असेल तर त्यांना मूलभूत शिक्षण करू देऊन त्यांच्या कलेत पारंगत व्हायला मदत करा. याशिवाय पालकांनी मुलांच्या निवडीमध्ये रस घ्यावा. त्यांना जे याने मुलांची वाढ चांगली होते. शिवाय मुल याने ॲक्टिव होतात.

3. तुमचा मुलांबद्दलचा दृष्टिकोन हा स्वभाव आशावादी ठेवा. हे तुमच्या मुलाला यशस्वी होण्यास देखील मदत करते. आशावादी मुल आपल्या वाटेत येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जायला आणि अडथळ्यांवर मात करायला अधिक सक्षम होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT