Summer Health Tips : summer health Tips Best Sharbat Recipes
Summer Health Tips : summer health Tips Best Sharbat Recipes esakal
लाइफस्टाइल

Summer Health Tips : उन्हाळ्यात शरीर थंडगार करायचं असेल तर या फळाचा ज्युस प्यायलाच लागतोय!

Pooja Karande-Kadam

Summer Health Tips : ​बेलाच्या झाडाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. भगवान शंकरांना बेलाची पाने आवडतात. तर आपल्या आरोग्यासाठीही या पानांचा आणि बेलाच्या फळाचा उपयोग होतो. बेलाची फळ ही संत्र्याच्या जातीतील आहेत. बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो आणि त्यांच्या चंदनासारखा सुगंध वनातले वातावरण भारून टाकणारा वाटतो.

केवळ बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने व खोडाचा गाभा याचाही औषधी उपयोग होतो. बेलफळाचा मुरंबा,सरबत रुचकर औषध ,भूक वाढणारे टॉनिक या गुणवंत झाडाच्या खोडावर खालपासून वरपर्यंत तीक्ष्ण काटे असतात.(Summer Health Tips : summer health Tips Best Sharbat Recipes)

 ​

आतडे उघडतील

जेव्हा पचन बिघडते तेव्हा आतड्यांचे आकुंचन कमी होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे ही समस्या गंभीर होऊ शकते. पण बेल फळाचा रस पाणी भरून आतड्यांना आराम देतो आणि आकुंचन सामान्य करण्यास मदत करतो.

​हाडांना मजबूत बनवते

पोटाव्यतिरिक्त, बेल फळांचा रस हाडांसाठी फायदेशीर आहे. यातील कॅल्शियमची पातळी शारीरिक रचना मजबूत ठेवण्यास मदत करते. हे पेय झटपट ऊर्जा देण्यासाठी देखील ओळखले जाते.

​रक्त वाढवते

बेल ज्यूसमध्ये व्हिटॅमिन बी 2 असते, जे शारीरिक विकासास मदत करते. हा पौष्टिक गुणधर्म लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.

गॅसची समस्या

जर तुम्हाला खूप गॅस होत असेल, बद्धकोष्ठतेची समस्या असेल, पोटात जडपणा असेल तर तुम्ही बेलच्या ज्यूसचे नक्कीच करायला हवे. बेल पोटाची उष्णता शांत करते आणि या समस्यांपासून आराम देते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय उष्माघात होण्याची भीती असते. अशा वेळी बेलचा ज्यस प्यायल्याने खूप आराम मिळतो.

वजन कमी करण्यास मदत

तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असले तरी, बेल सिरप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बेलमध्ये भरपूर फायबर असते. हे प्यायल्यानंतर तुम्हाला खूप आराम मिळतो आणि तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. यामुळे ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे अशांनी आपल्या आहारामध्ये बेलाच्या ज्यूसचा समावेश करायला हवा.

हाय बीपीची समस्या

हाय बीपी किंवा कोलेस्टेरॉल जास्त असलेल्या लोकांसाठी बेल सिरप देखील खूप फायदेशीर आहे. त्यात लिपिड प्रोफाइल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित करण्याची क्षमता आहे. यामुळे बीपी असलेल्यांनी आपल्या आहारामध्ये बेलाच्या ज्यूसचा समावेश करायला हवा. विशेष म्हणजे जर आपण हा ज्यूस नाश्त्यामध्ये घेतला तर ते अधिक फायदेशीर ठरेल.

मधुमेह

बेल सिरप मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. यामध्ये रेचक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. पण त्यांनी त्याच्या पाकात साखर वापरू नये. मधुमेही रुग्णही ज्यूसऐवजी थेट बेलचे सेवन करू शकतात.

कसे सेवन करावे बेल फळ

पिकलेल्या बेल फळ कापून त्यातील गर काढून घ्या.

यामध्ये तीन ग्लास पाणी घाला आणि तो मिक्स करून घ्या

गरज वाटल्यास हा गर तुम्ही मिक्सरमध्येही फिरवू शकता

त्यानंतर गाळून हा रस पिण्यास द्यावा

हे फळ तसे गोडच असते, तुम्हाला वाटल्यास त्यात साखर, किंवा गूळ घालू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT