lips care 
लाइफस्टाइल

Summer Lips Care: कोरड्या ओठांपासून सुटका करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

सकाळ ऑनलाईन टीम

Summer Lips Care Tips: बदलत्या ऋतुनुसार सर्वांना ओठांची काळजी असते. तसेच बदलत्या वातावरणाचाही मोठा परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरीरावर होतो. वातावरणातील बदलामुळे ओठ सुकून फाटले जातात. थंडीत हे सहाजिक आहेच पण काही जणांना उन्हाळ्यातही हा त्रास जाणवतो. जशी आपली त्वचा चांगली राहण्यासाठी नेहमी हायड्रेटेड राहण्याची गरज असते तशीच ओठांनाही हायड्रेटेड असणे राहण्याची गरज असते.

ओठ फाटण्याचे एक कारण म्हणजे आपल्या शरीरात कमी प्रमाणात असणारे पाणी. शरीरात पाणी कमी झाल्यावर ओठ कोरडे पडतात किंवा फाटतात. उन्हाळ्यात बऱ्याचदा खाण्यात कमी- जास्त झाल्यानेही त्याचा परिणाम ओठांवर होतो. ओठांची काळजी कशी घ्यावी आणि कोणत्या घरगुती पद्धतीने काळजी घेता येईल त्याबद्दल जाणून घेऊया.

1. काकडी: उन्हाळ्यात काकडीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काकडीमध्ये जवळपास ९० टक्के पाणी असते. तसेच हे हायड्रेटिंग एजंट म्हणून कार्य करते. जर कोरड्या आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर त्यावर काकडीचा रस फायदेशीर ठरतो. यामुळे ओठ मुलायम होण्यास मोठी मदत होती.

२. मध: आयुर्वेदात औषध म्हणून मधाचा वापर केला जातो. त्यामुळे मध त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ओठांना कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी, आपण व्हॅसलीनमध्ये मध मिसळून ओठांवर लावू शकता. नंतर ते स्वच्छ कपड्याने किंवा कापसाने स्वच्छ करा. ते आपल्या ओठांना मऊ आणि सुंदर बनविण्यास मदत करतात.

३. नारळ तेल: नारळ तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे काम करते. यात फॅटी ऍसिड असतात जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास तसेच ओठ मऊ ठेवण्यास मदत करतात. नारळाच्या तेलात एक ते दोन एसेंसियल तेलाचा वापर केल्याने ओठ चांगले राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नाला अवघे ५ महिने! पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाचा थरकाप उडवणारा अंत, रेल्वेसमोर उडी घेत संपवलं जीवन...

Parbhani News: जोडपं झाडाखाली गप्पा मारताना अचानक ६ जणांनी घेरलं, पुढे भयंकर घडलं.. | Sakal News

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची केली तोडफोड

Kolhapur Buffalo Road Show : कोल्हापुरात अनोखा रोड शो, Yamaha च्या मागे म्हशी पळवण्याची परंपरा; नटलेल्या म्हशी बघून तुम्हीही म्हणाल, 'सुंदरी सुदंरी...'

Sarfaraz Khan : रिषभ पंतमुळे भारत अ संघात सर्फराजची निवड झाली नाही; युवा फलंदाजाला संघात स्थान मिळण्यासाठी दिला गेलाय सल्ला...

SCROLL FOR NEXT