Summer Skin Care: Sakal
लाइफस्टाइल

Summer Skin Care: तुमचाही चेहरा उन्हात गेल्यावर लाल होतोय? मग वापरा 'या' घरगुती गोष्टी

Summer Skin Care: उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही चेहऱ्याला स्कार्फ न बांधता घराबाहेर गेला तर लालसरपणा किंवा चेहरा काळा पडू शकतो. यासाठी घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

पुजा बोनकिले

summer skin care home remedies for redness on face

उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. या दिवसांध्ये आरोग्यासह त्वचेसंबंधित देखील समस्या वाढू लागतात. उन्हाळ्यात चेहऱ्याला स्कार्फ बांधून बाहेर पडलो नाही तर चेहऱ्यावर लाल डाग दिसू लागतात. त्यामुळे चेहरा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतो.

जर तुमची त्वचा देखील संवेदनशील असेल आणि कडक सूर्यप्रकाशामुळे तुमचा चेहरा निस्तेज आणि लाल होऊ लागला असेल पुढील घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

  • चंदन

चंदनामुळेही चेहऱ्याला थंडावा मिळतो. त्यामुळे तुम्ही याचा वपार करू शकता. चंदन पेस्ट तुमच्या चेहऱ्याला चमकदार ठेवण्यास मदत करते. यासाठी चंदन पावडरमध्ये थोडे गुलाबजल मिक्स करावे.नंतर चेहऱ्यावर लावावे. 10 मिनिटानंतर कोरडे झाल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा.

  • दही

दही आरोग्यासह चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने चेहरा हायड्रेटेड राहते. कारण त्यात प्रोबायोटिक गुणधर्म असतात. जे त्वचेला थंड करतात. त्यामुळे तुम्ही दह्याचा पॅक बनवून दररोज चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी एका भांड्यात 1 चमचा दही घ्यावे. गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून त्यात मिक्स करावे. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावावा. आता 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होईल. तसेच तुमच्या त्वचेवर लाल डाग दिसणार नाहीत.

  • नारळ पाणी

नारळाच्या तेलासोबत नारळपाणी आरोग्य आणि चेहऱ्यासाठी फायदेशीर असते. नारळ पाणी त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. नारळ पाणी चेहऱ्यावर लावल्यास लालसरपणा कमी होतो.

  • बर्फ

तुमचाही चेहरा उन्हात गेल्यावर लाल होत असेल तर बर्फाचा वापर करू शकता. यासाठी एका सुती कापडामध्ये बर्फ घ्यावा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवावा. यामुळे लालसरपणा कमी होईल. बर्फ थेट चेहऱ्यावर लावू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: राज्य सरकारला मोठा झटका! ६७% ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Prakash Londeh :'भूयार' सापडलेल्या परिसरात महापालिकेची कारवाई; लोंढे कुटुंबाच्या अडचणीत वाढ

फ्रेश लुक असलेला "लास्ट स्टॉप खांदा चित्रपटाचा टीजर लाँच; 'या' दिवशी येणार भेटीला

Ranji Trophy 2025 : अर्जुन तेंडुलकरच्या संघातून दोघांची द्विशतकं, गोवा संघाच्या ८ बाद ५५० धावा! सचिनच्या लेकाच्या यात किती धावा?

Diwali Makeup Tips: दिवाळीत मेकअप करताना या' चूका टाळा, अन्यथा त्वचा होईल खराब

SCROLL FOR NEXT