how to keep house cool in summer naturally
how to keep house cool in summer naturally Esakal
लाइफस्टाइल

House Cooling Techniques: AC शिवाय घर ठेवायचंय गार? मग या ट्रीक येतील कामी

Kirti Wadkar

House Cooling Techniques: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये Summer शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या असल्याने या काळात अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत थंड हवेच्या ठिकाणी जाणं किंवा अलिकडे पूल पार्टी Pool Party किंवा रिसोर्टवर Resort गेट टुगेदर असे प्लान आखतात.

मात्र ही मजा केवळ ३-४ दिवसांची असते. त्यानंतर मात्र उन्हाळा नकोसा वाटतो. एसी AC किंवा फंखे लावून घरातच बसावं आणि कुठेच बाहेर पडू नये असं अनेकांना वाटतं. summer tips how to keep house cool in summer naturally

उन्हाळ्यात घरात बसून एसीची Air Conditioner हवा खात असताना मात्र अनेकांना वाढत्या वीज बिलाची चिंता देखील असते. घर गारही ठेवायचं आहे आणि वीजबीलाची Electricity Bill चिंता अशी परिस्थिती असते. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांमध्ये वीजेचा मोठा वापर तर होतोच मात्र एसी आणि कुलरच्या अति वापरामुळे याचा ग्लोबल वार्मिंगवरही Global Warming परिणाम होत असतो. 

यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी काही अशा टिप्स घेऊन आलो आहोत. ज्या उन्हाळ्यात तुम्हाला आणि तुमच्या घराला गार ठेवण्यास मदत करतील तेही कमी वीजेचा वापर करून. यामुळे वीज बील तर कमी येईलच शिवाय निसर्गाला देखील हानी पोहचणार नाही. 

घराच्या खिडक्या बंद ठेवा- दुपारच्या वेळेतही तुम्हाला जर घर थंड ठेवायचं असेल तर घराच्या सर्व खिडक्या आणि काचा बंद करा. खास करून ज्या दिशेन घरात ऊन येत असेल तिथल्या खिडक्या बंद असतील याची काळजी घ्या. 

कडक उन्हाळ्यात घर गार ठेवण्यासाठी ब्लॅक-आउट पडद्यांमध्ये थोडी गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला मोठे फायदे होतील. हे पदडे जाड असल्याने यातून सुर्यप्रकाश घरात शिरत नाही. त्यामुळे घर गार राहण्यास मदत होते. 

हे देखिल वाचा-

घराच्या भिंती किंवा काचा गार राहिल्या तर आपसूकच घर गार राहण्यासाठी पंखा किंवा एसीचा कमी वापर करावा लागेल. यासाठीच भिंत बाहेरून झाकली जाईल असे प्रयत्न करा. तुम्ही घराच्या बाहेरील बाजून काही रोपांच्या कुंड्या ठेवू शकता. तसचं खिडक्या किंवा स्लायडिंग विंडो असेलेल्या बालकनीत थोड्या मोठ्या कुंडया असलेली रोपं ठेवा. 

बैठ घर असलेल्यांसाठी घराभोवती मोठी झाडं लावणं हा घर गार ठेवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. 

उन्हाळ्यात जर तुम्हाला एसी वापरायचाच असेल तर थर्मोस्टॅट २४ ते २७ सेल्सियम दरम्यान ठेवा. घर गार राहण्यासाठी ते २० हून कमी ठेवू नका. जर तुम्ही नवा एअर कंडीशनर घेण्याचा विचार करत असाल तर ५ स्टार रेटिंग असलेल्या एसीमध्ये गुंतवणूक करा. ५ स्टार रेटिंग असलेली उपकरणं कमी इलेक्ट्रीसीट कंझप्शन म्हणजेच कमी वीज खेचतात. त्यामुळे वीज बील कमी येण्यास मदत होते. 

ज्या खोल्यांमध्ये तुम्हाला ये-जा करायची नाही किंवा तुम्ही वापरत नाहीत त्या खोल्यांची दारं बंद ठेवा. तसचं खिडक्या आणि दारांमध्ये फट राहणार नाही याची काळजी घ्या. 

दिवसभर खिडक्या दार बंद ठेवल्यानंतर संध्याकाळी मात्र खिडक्या आवर्जुन उघडा. सुर्य खाली गेल्यानंतर वातावरण सामान्य झाल्यानंतर घरात बाहेरील थंड हवा आल्याने घर गार होईल. 

उन्हाळ्याच्या दिवसात सुती आणि फिक्या रंगाचे कपडे परिधान करावे. सुती आणि लूज कपड्यामुळे कमी उकडतं.

जर तुम्हाला तुमच घर गार ठेवण्यात अडचण येत असले तर त्यासाठी तुमच्या घरातील लाईटचे बल्ब देखील त्यासाठी जबाबदार ठरू शकतात. काही घराममध्ये अजूनही जुने पूर्वीच बल्ब वापरले जातात. त्याएवजी नवे LED एनर्जी सेव्हिंग ब्लब वापरा यामुळे देखील घर गार राहण्यास मदत होईल. 

हे देखिल वाचा-

याशिवाय बाजारात वाळ्याचे पडदे उपलब्ध असतात. हे पडदे तुम्ही दारं खिडक्यांना  लावू शकता. या पडद्यांवर पाणी शिंपडून ठेवल्यास घरात चांगला गारवा राहतो. 

तसंच घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणं जास्त वेळ सुरु राहिल्याने ती तापतात आणि वातावरण गरम होतं. यासाठी आवश्यकता नसल्यास ही उपकरणं बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. 

याचसोबत घरात सतत स्वयंपाक गरात स्वयंपाक सुरू राहिल्यास खूप उष्णता निर्माण होते. शक्य असल्यास किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन लावा. जर तुमच्याकडे एक्झॉस्ट फॅन नसेल तर शक्य झाल्यास सकाळी ११ पूर्वी सर्व स्वयंपाक उरका. यामुळे किचमधून बाहेर येणाऱ्या गरम वाफेमुळे होणारी गरमी टाळता येईल. 

अशा प्रकारे काही ट्रीक्स वापरून तुम्ही उन्हाळ्यातही घर गार ठेवू शकता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT