Super Food For Kids esakal
लाइफस्टाइल

Super Food For Kids:  मुलांना मानसिक-शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनवतील हे सुपरफूड, असा करा आहारात समावेश

मुलांचा विकास व्हावा यासाठी घरातीलच काही सुपरफुड्स मदत करतात

Pooja Karande-Kadam

Super food for kids:  

आजकाल मुलांच्या शारीरिक विकासासोबत मानिसक विकासही व्हायला हवा. यासाठी पालक प्रयत्न करतात. यासाठी मुलांच्या विविध ऍक्टिव्हीटी घेतल्या जातात. शाळाही मुलांचा मानसिक विकासावर भर देणारे प्रयोग राबवतात. पालकही याबाबतील जागरूग असतील तर ते याविषयी अधिक माहिती घेऊन मुलांना योग्य ट्रेनिंग देत असतात.

तुम्हीही तुमच्या पाल्याच्या मानसिक,शारीरिक विकासासाठी प्रयत्न करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची आहे. मुलांचा सर्वोतोपरी विकास व्हावा यासाठी घरातीलच काही सुपरफुड्स मदत करणार आहेत.

तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करता आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करता. मुलांना विकासासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते.

आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या सुपरफूडचा नियमित आहारात समावेश केला जाऊ शकतो.

केळी

हे एक फळ आहे जे सर्वांनाच खायला आवडते. जर मुलांनी हे रोज खाल्ले तर त्यांच्या शरीराला व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बायोटिन आणि फायबर मिळत राहतील. केळी मुलांना ऊर्जा देण्याचे काम करते.

मुलांना केळी खायला द्यायची असतील तर शेक बनवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. किंवा शिऱ्यामध्ये केळी घालू शकता. त्यामुळे शिऱ्याची चवही वाढते अन् तो मुलांसाठी चांगला नाश्ता होऊ शकतो.

अंडी

हे अत्यावश्यक सुपरफूडपैकी एक मानले जाते, आरोग्य तज्ञ अनेकदा ते नाश्त्यात खाण्याची शिफारस करतात. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि फॉलिक अॅसिडसह अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात.

जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहेत. मुलांना अंडी उकडून खाण्याची सवय लावा. किंवा त्याचे प्लेन ऑमलेट, पराठा देत जा.

अंड्याचा टेस्टी पराठा मुलांना खायला आवडतो

दुध

दुधाला संपूर्ण आहार म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही, कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे मुलांच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. यामुळे शरीराला कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मिळतात ज्यामुळे मुले मजबूत बनण्यास मदत होते. मुलांना फक्त दूध पिण्याची सवय लावा. तसे पीत नसतील तर त्यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर घालू शकता.

ओट्स

हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. त्यात विरघळणारे फायबर आणि बीटा-ग्लुकन असते जे हृदयाचे आरोग्य सुधारते कारण ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. मुलांच्या आरोग्यासाठी न्याहारीमध्ये ओट्स खायला द्या. मुलांना ओट्सचा चिला, खीर बनवून देऊ शकता.

ओट्सचा चिला मुलांना डब्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT