What Not To Eat With Tea esakal
लाइफस्टाइल

Tea Lovers : थंडीत गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा प्यायला आवडतो? आताच व्हा सावध, नाहीतर...

चहा आणि काही पदार्थांचं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक असतं. त्यामुळे दुप्पट वेगानो पित्त वाढतं. जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

What Not To Eat With Tea : हिवाळ्याची थंडी असो किंवा पावसाळा वाफाळलेला चहा हा अनेकांचा जीव की प्राण असतो. त्यासोबतच कांदा बजी, पालक, मेथी भजी मिळाले तर आहाहा... सोने पे सुहागा. पण इथेच तुम्ही चुकताय. काही पदार्थ चहा सोबत खाणं म्हणजे आरोग्यासाठी प्रचंड घातक असतं.

असं म्हणतात चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच. चहासाठी सामानही कमी लागतं. एक चमचा पावडर, एक चमचा साखर, पाणी आणि थोडं दूध झाला चहा तयार. आता त्यात आवडीनुसार आले, काळीमिरी, तुळस, वेलची, केशर काहीही टाकता येतं. चहाबरोबर अनेकांना फरसाण, पोळी, भजी हे खायला सुद्धा आवडतं. पण या तुमच्या आवडी कदाचित जीवावरही बेतू शकतात.

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार मीठ व दूध कधीच एकत्र खाऊ नये. म्हणजेच चहामध्ये दूध असते तर भजी, पोळी फरसाण हे तेलकट आणि खारट असतं, त्यामुळे फरसाण आणि चहा एकत्र घेतल्यास पोटात दुखू शकते. त्यामुळे दुधाच्या पदार्थांसह फरसाण अर्थात खारट पदार्थांचे सेवन करू नये. याशिवाय चहासह कोणत्या गोष्टींचे सेवन टाळायला हवे हे जाणून घेऊयात..

लिंबू : अनेकांना लेमन टी आवडतो, डाएटसाठीही लेमन टी चांगला असं सांगितलं जातं. परंतु तुम्हाला माहित आहे का की, चहाची पाने लिंबूसोबत मिसळली की त्यात आम्ल वाढते. यामुळे पचनप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

सुका मेवा : दुधासह लोहयुक्त पदार्थ खाणे चुकीचे आहे. चहासोबत सुका मेवा खाल्ल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. चहामध्ये असलेले टॅनिन नावाचे घटक पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते.

हिरव्या भाज्या : काही खाद्यपदार्थ एकत्र केल्याने त्यातील पोषणसत्व सुद्धा हानिकारक असू शकतात. चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सॅलेट्स नावाची संयुगे असतात जी रक्तात लोह शोषून घेण्यात अडथळा ठरू शकतात. यामुळे लोहयुक्त भाज्या, सुका मेवा चहासह खाणे टाळावे

हळद : हळदीचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांसह चहा पिणे टाळा. चहा आणि हळदीमध्ये असलेले रासायनिक घटक पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात. यामुळे शरीरात ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो.

बेसन : चहाबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बहुतांश वेळा बेसन असतं. अगदी गरम भजी ते फरसाण साधारणपणे बेसन किंवा पिठापासून बनवले जातात. यामुळे पचन समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे नंतर बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT