Health Benefits Of Chyavanprash esakal
लाइफस्टाइल

Health Benefits Of Chyavanprash : आरोग्यासाठी बहुगुणी आहे च्यवनप्राश, जाणून घ्या ‘हे’ फायदे

च्यवनप्राशमध्ये अनेक औषधी वनस्पती आणि पोषक घटकांचा समावेश असतो.

सकाळ डिजिटल टीम

Benefits Of Chyavanprash : च्यवनप्राश हे एक आयुर्वेदिक औषध आहे. च्यवनप्राशला आपण ‘आरोग्यवर्धक टॉनिक’ असे ही म्हणू शकतो. च्यवनप्राशमध्ये अनेक औषधी वनस्पती आणि पोषक घटकांचा समावेश असतो. निरोगी आरोग्यासाठी रोज एक चमचा च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. प्राचीन काळापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राशचे सेवन केले जाते. हे संपूर्णपणे नैसर्गिक आहे.

च्यवनप्राशमध्ये अनेक औषधी वनस्पती, मसाले, खनिजे आणि व्हिटॅमिन्सचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे, आरोग्यासाठी हे अतिशय फायदेशीर मानले जाते. केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नाही तर त्याचे इतर ही अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. आज आपण च्यवनप्राश खाण्याचे कोणते फायदे आहेत ? ते जाणून घेणार आहोत.

च्यवनप्राश खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे ?

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

कोरोना महामारीनंतर अनेक जण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. च्यवनप्राशचे रोज १ चमचा सेवन केल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषकघटक यातून मिळतात, आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

च्यवनप्राशमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म आपल्याला ताप, सर्दी, घसा आणि श्वसनाच्या इतर समस्यांचा सामना करण्यासाठी मदत करतात. थोडक्यात आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

च्यवनप्राशमध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश आढळतो. त्यामुळे, हे पोषकघटक आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. शिवाय, च्यवनप्राशमध्ये असलेले फ्लेवोनॉईड्स आपल्या शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यास मदत करतात. त्यामुळे, च्यवनप्राशचे सेवन केल्याने आपल्याला वारंवार भूक लागत नाही. परिणामी भूकेवर नियंत्रण मिळवले जाते, ज्यामुळे, वजन कमी होण्यास मदत मिळते.

पचनक्षमता सुधारते

च्यवनप्राशमध्ये असलेले गुणधर्म पचनक्षमता सुधारण्यास देखील मदत करतात. या गुणधर्मांमुळे पोटात गॅस होण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. तसेच, पोट फुगणे, पोट जड होणे या समस्या दूर होतात.

च्यवनप्राशमध्ये असलेल्या औषधी वनस्पतींच्या गुणधर्मांमुळे पोटाच्या समस्या जसे की, अपचन, अल्सर इत्यादी समस्यांची शक्यता कमी होते. नियमितपणे १ चमचा च्यवनप्राश खाल्ल्याने पचनक्षमता सुरळीत होते.

एकाग्रता वाढते

लहान मुले असो की मोठी माणसे सर्वांसाठी नियमितपणे च्यवनप्राश खाणे हे लाभदायी आहे. एकाग्रता वाढण्यासाठी आणि मेंदूच्या सक्रियतेसाठी च्यवनप्राश खाणे हे फायदेशीर ठरते. मानसिक ताण कमी होण्यास आणि मेंदूच्या विकासामध्ये च्यवनप्राश खाणे हे फायदेशीर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT