Social Media Sakal
लाइफस्टाइल

मुलांनो, पॉकेटमनी हवाय, फॉलो करा 'हे' चार मार्ग

तुम्ही सोशल मीडियाचा आधार घेत घरातून काम करत भरपूर कमावू शकता

सकाळ डिजिटल टीम

इंटरनेटमुळे आपल्या आयुष्यात खूप मोठा प्रभाव पडला आहे. एकूण काम एका क्लिक वर होऊ लागलं आहे. सध्या कोरोनामुळे (Corona) सामाजिक अंतराच्या नियमांमुळे, अनेक लोकं ऑनलाइन पैसे (Money) कमवत आहेत. दिवसेंदिवस असे पैसे कमावण्याकडे लोकांचा ओढा वाढतो आहे. हायस्कूल आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना ज्यांना इंटर्नशिप करायची आहे त्यांना ती करणं या काळात कदाचित कठीण जाऊ शकतं. अशावेळी या मुलांनी त्यांचं कौशल्य सोशल मिडीयावर (Social Media) दाखवत ते उत्पन्न मिळवू शकतात. त्यातून त्यांना चांगला पॉकेटमनी मिळू शकतो. भविष्यात सरसकट जॉब करण्यापेक्षा तुम्ही अशा क्षेत्राचा आधार करिअरसाठी घेऊ शकता. त्यासाठी चार मार्गांचा अगदी योग्य पद्धतीने वापर केल्यास तुम्ही सोशल मीडियावर भरपूर पैसे कमवू शकता.

१) फ्रिलान्सिंग - पैसे कमविण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही कॉपीरायटिंग, भाषांतर, ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिंटिंग, अॅप डेव्हलपर, सोशल मार्केटिग अशा अनेक पर्यायावर काम करू शकता. तुमच्या कौशल्यानुसार येथे तुम्हाला पैसै मिळतात. हे काम करण्यासाठी भारतीय, परदेशातल्या वेबसाईट्स तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच तुम्हाला योग्य मोबदला मिळतो. यामध्ये चेग इंडिया(Chegg India), फ्रीलान्स इंडिया( Freelance India) , फ्रीलान्सर (Freelancer) , अपवर्क (Upwork) , Fiverr इत्यादींचा समावेश आहे. या साईटवर तुम्ही नाव रजिस्टर करा. तुमची पूर्ण माहिती भरा. एकदा सर्व डिटेल्स व्हेरिफाईड झाले की तुमचं अकाऊंट सुरू होईल. अकाऊंट सुरू झाल्यावर तुम्ही तुमचं शिक्षण, अनुभव, कश्यात पारंगत आहात याची डिटेल माहिती भरावी. नोकरी मिळविण्याचा योग्य वेळ भरल्यावर तुम्हाला फ्रिलान्स काम करण्यासाठी परवानगी मिळते. यात तुम्हाला मिळणारा मोबदला हा फिक्स नसतो. तुम्ही तासानुसार किंवा महिन्याचा पगारही घेऊ शकता. पण मिळणारा मोबदला हा तुमच्या कामानुसार ठरतो.

instagram

२) इंस्टाग्राम इंन्फ्लुएंसर ( Instagram influencer)

प्रभाव असणाऱ्या लोकांना सोशल मीडियावर भरपूर लोक फॉलो करतात. यात मोठमोठ्या सेलिब्रिटींसह, इंडस्ट्री, गॅमिंग, फूड, सौंदर्य, फॅशन, फिटनेस यात लोकप्रिय असलेल्या लोकांना टीएनजर्स, तरूणाई खूप फॉलो करते. त्यामुळेच तुमच्याकडे चांगल्या आयडिया असतील तर त्या पोस्ट करून, व्हिडिओ टाकून तुम्ही इंस्टाग्रामवर हीट होऊ शकता. एकदा का तुम्हाला लोकं फॉलो करून लाईक्स वाढले की त्यातही तुम्हाला १० लाखांपेक्षा जास्त कमाई करता येऊ शकते. मात्र तुमचे फोलोअर्स तेवढे हवे.

YouTube

३) ब्लॉगिंग, व्लॉगिंग (Blogging/Vlogging)

तुमच्या आवडीच्या विशिष्ट विषयावर ब्लॉगिंग केल्यास म्हणजे लिखाणा केल्यास, तु तुम्ही वाचक तुमच्या लिखाणाकडे खेचू शकता. जेवढे वाचक वाढतील तेवढे तुमचे पैसे वाढतील. Youtube वर ब्लॉग किंवा व्लॉगद्वारे तुम्ही कमाई करू शकता असे विविध मार्ग आहेत, जसे की Google AdSense द्वारे जाहिरात प्लेसमेंट, तुमच्या ब्लॉगवर इतरांच्या उत्पादनांचा प्रचार करणे, इतरांकडे गेस्ट रायटर म्हणून लिहिणे, असे विविध मार्ग आहेत. ब्लॉग लिहिण्यासाठी वर्डप्रेस, ब्लॉगर, टंमब्लर अे अनेक पर्याय वापरू शकता. त्यावर रजिस्टर करून तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे.मात्र व्लॉगिंग तुम्ही युट्यूब, इंस्टाग्रा, फेसबुकवरही करू शकता. ब्लॉगर महिना २० ते ३० हजार रूपये कमावू शकतात. पण सुरूवातीच्या काळात वय कमी असल्याने मुलांना थोडे कमी पैसे मिळू शकतात. भारताचा टॉप ब्लॉगर अमित अग्रवाल ४४.४ लाख रूपये महिना कमावतो.

4) पॉडकास्टचा उपयोग (Storytelling via podcasts)

जर तुमच्याकडे बोलण्याची चांगली कला असेल आणि गोष्टी सांगायला तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अशीही कमाई करू शकता. पॉडकास्ट ही डिजिटल ऑडिओ किंवा व्हिडिओ फाइल्सची मालिका आहे जी फक्त ऐकण्यासाठी वापरता येते. त्यासाठी काही अॅप डाऊनलोड करावे लागतात. सध्या २०० दशलक्षपेक्षा जास्त लोकं पॉडकास्ट एेकतात. लॉकडाऊनमुळे ऑडिओबुक्स एेकण्यात वाढ झाली आहे. तुम्हाला जर असं काही करायचं असेल तर तुमचा आवाज मोबाईलवर रॅकोर्ड करून तुम्ही सुरूवात करू शकता. व्यावसायिक आवाज असल्यास अनेक उपकरणे बाजारात आहेत. त्याचा वापर करा. पॉडकास्ट पोस्ट प्रकाशित करण्यासाठी Apple हे प्रीमियर पॉडकास्ट प्लॅटफॉर्म तसेच, Google Podcast, Anchor, Spotify हे पर्यायही आहेत. येथे तुम्हाला रजिस्टर करावे लागेल. जर तुमचे पॉडकास्ट ५०० पेक्षा जास्त लोकांनी एेकले तर तुमचे इन्कम सुरू होईल. जर तुम्हाला जाहिरातदार मिळाले तर तुमचं इन्कम आणखी वाढू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT