ऑफिसमध्ये काम करत असताना अनेकदा काही कारणास्तव सहकाऱ्यांमध्ये वाद होत असतात. यात काही जण वाद मिटवून पुढे जातात. तर काही जण तोच राग मनात ठेऊन इतरांच्या कामात अडथळा निर्माण करतात. मात्र, इतरांना त्रास देत असताना बऱ्याचदा त्याचा परिणाम आपल्या कामावरही होत असतो. त्यामुळेच ऑफिसमध्ये सगळ्यांसोबत मिळूनमिसळून राहणे, एकमेकांना मदत करणे कायमच फायद्याचं ठरतं. यामध्येच आपल्या कामाची गुणवत्ता वाढविण्यासोबत एक ... त्यामुळेच आपल्या प्रगतीचा आलेख जास्त उंचावतो. म्हणूनच,एक चांगला टीम मेंबर कसं व्हावं ते पाहुयात. (these things will work to become a good team member)
१. सगळ्यांशी संवाद साधा -
ऑफिसमध्ये काम करत असताना मतभेद, गैरसमज निर्माण होणे हे काही नवीन नाही. काम करताना अशा लहान-मोठ्या तक्रारी कायमच घडत असतात. मात्र, कोणत्याही गोष्टीचा राग मनात न ठेवता पुन्हा एकत्र मिळून काम करणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळेच तुमच्यातील समंजसपणा, शांतपणा इतरांच्या निदर्शनास येतो. इतकंच नाही तर प्रत्येक जण तुमच्याशी मैत्री करायला येतो.त्यामुळे कोणासोबतही वाद झाले तरीदेखील ते विसरुन प्रत्येकाशी संवाद साधा.
२. इतरांची मदत करा -
तुमच्या जवळील माहिती, कल्पना, सुचलेल्या नवीन गोष्टी इतरांसोबत शेअर करा. तसंच एखाद्याची अडचण लक्षात घेऊन त्याला मदत करा. यामुळे ऑफिसमध्ये सहकाऱ्याचं आणि हसतंखेळतं वातावरण तयार होतं. तसंच कोणालाही मदत केल्यानंतर त्याचा गाजावाजा करु नका. कोणतीही मदत ही मनापासून करा. केवळ दिखावा म्हणून करु नका.
३. इगो नको-
ऑफिसमध्ये काम करताना आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटत असतात. त्यामुळे अशा लोकांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. काम करत असताना कधीही मध्ये इगो आड आणू नका. जर प्रत्येक कामात तुमचा इगो येत असेल तर तुमच्याशी कोणीही मैत्री करायला येणार नाही.
४. गॉसिप करु नका -
प्रत्येक ऑफिसमध्ये गॉसिप करणाऱ्या लोकांचा एक ग्रुप पाहायला मिळतो. परंतु, अशा कोणत्याही ग्रुपचा भाग होऊ नका. इतरांविषयी चर्चा करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा. सतत गॉसिप केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. तसंच ऑफिसमध्ये सुद्धा नकारात्मक वातावरण निर्माण होतं. त्यामुळे अशा ग्रुपपासून लांब रहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.