Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांची चिडचिड अन् मूड स्विंग्स सांभाळणं होईल सोपं; फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

प्रौढांप्रमाणेच लहान मुले देखील चिडचिडेपणा आणि निराशेचा सामना करतात.

सकाळ डिजिटल टीम

Parenting Tips : लहान मुलांचा मूड हा सतत बदलत राहतो. मग त्यांचा मूड ठीक करण्यासाठी पालकांना आटोकाट प्रयत्न करावे लागतात. मुलांच्या बिघडलेल्या मूडमुळे किंवा त्यांच्या वाढत्या चिडचिडीमुळे पालक देखील चिंतेत असतात.

मुलांची ही चिडचिड नेमकी कशामुळे होत आहे? हे शोधण्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा. प्रौढांप्रमाणेच लहान मुले देखील चिडचिडेपणा आणि निराशेचा सामना करतात. मुलांची चिडचिड झाली की, काही पालकांना असे वाटू शकते की, कदाचित आपल्याला मुलाची किंवा मुलीची ही चिडचिड हाताळण्यात यश येत नाही.

मात्र, मुलांमध्ये मूड-स्विंग्स होणे हे अतिशय सामान्य आहे. सतत बदलणाऱ्या मूड्समुळे किंवा बिघडलेल्या मूडमुळे चिडचिड होऊ शकते. ही चिडचिड कमी करण्यासाठी किंवा मुलांचा मूड बदलण्यासाठी पालक अशा परिस्थितीमध्ये काही सोप्या टीप्स नक्की फॉलो करू शकतात. कोणत्या आहेत या टीप्स ? चला तर मग जाणून घेऊयात.

आराम करण्यावर भर द्या

लहान मुले दिवसभरात खूप उत्साही असतात. त्यांना अशा वेळी खेळायला जास्त मजा येते. मात्र, मुलांचा हा उत्साह टिकून राहण्यासाठी त्यांना पॉवर नॅप अर्थात दुपारची झोप अतिशय महत्वाची आहे.

मुलांना व्यवस्थित आराम जर मिळाला नाही तर, त्यांची चिडचिड होऊ शकते. सतत अभ्यासाला त्यांना बसवू नका. अभ्यास करताना छोटासा ब्रेक त्यांना घेऊ द्या. त्यांचे एक वेळापत्रक बनवा आणि त्यात त्यांना विश्रांती घेण्यासाठी एक वेळ राखून ठेवा. त्यामुळे, ते फ्रेश राहतील.

मुलांसोबत खेळा

जेव्हा मुलांचा काही कारणांमुळे मूड खराब असेल तेव्हा त्यांचा मूड ठीक होण्यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत खेळायला हवे. अशावेळी मुलांचा आवडता खेळ सोबत खेळा. यामुळे, त्यांचा मूड चांगला होईल आणि एकत्र खेळल्यामुळे पालकांचे मुलांसोबतचे नाते आणखी घट्ट होईल, यात काही शंका नाही.

संतुलित आहार आवश्यक

लहान मुलांचा आहार संतुलित आणि सकस असणे हे फार महत्वाचे आहे. हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय, त्यांच्यामध्ये ऊर्जेची पातळी राखण्यासाठी आहार तितकाच महत्वाचा आहे.

मुलांना फायबर, कर्बोदके आणि प्रथिनांनी युक्त असलेला आहार द्या. त्यामुळे, मुलांमध्ये दिवसभर ऊर्जा राहिल आणि मुलांमध्ये उत्साह टिकवून ठेवण्यास ही मदत मिळेल. योग्य संतुलित आहारामुळे मुलांची चिडचिड जास्त होणार नाही आणि मूड ही चांगला राहण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT