Diwali 2022 sakal
लाइफस्टाइल

Diwali 2022: दिवाळीपूर्वी 'या' वस्तू घरातून बाहेर काढा, नाहीतर..

दिवाळीपूर्वी तुम्ही घरात साफसफाई सुरू केली असेल तर आजच काही वस्तू घरातून बाहेर काढा.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू हा वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीसाठी सगळीकडे विशेष तयारी सुरू आहे. दिवाळीला लक्ष्मी घरी येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे प्रत्येकजण दिवाळीच्यापूर्वी घराची साफसफाई सुरू करतात. तुम्ही देखील दिवाळीपूर्वी घरात साफसफाई सुरू केली असेल तर आजच काही वस्तू घरातून बाहेर काढा कारण या वस्तूमुळे तुमच्यावर लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते. त्या वस्तू कोणत्या, चला जाणून घेऊया. (throw out these things out of the home before diwali check list)

  • तुटलेली फोटो फ्रेम कधीच घरी ठेवू नका. अशी फोटो फ्रेम घरात ठेवल्यास अशुभ मानली जाते. ज्या घरी तुटलेली फोटो फ्रेम असते त्या घरी लक्ष्मी पावले ठेवत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली फोटो फ्रेम ही वास्तुदोष निर्माण करते.

  • तुटलेला आरसा हा सुद्धा कधीच घरी ठेवू नये. वास्तूशास्त्रानुसार तुटलेला आरसा घरी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे तुटलेला आरसा घरातून बाहेर काढा

  • बंद घड्याळ कधीच घरात ठेवू नये. बंद घड्याळ घरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे आपल्या कार्यात अनेक अडचणी येतात. आपल्यावर वाईट काळ येतो. त्यामुळे दिवाळीपूर्वी बंद घड्याळ घरातून बाहेर काढा.

  • तुटलेला पलंग हा कधीच घरी ठेवू नये. असा पलंग ठेवणे, अशुभ मानले जाते. त्यामुळे तुटलेला पलंग तुमच्या घरी असेल तर त्वरीत घराबाहेर काढा नाहीतर दुरुस्त करुन घ्या

  • घरात कधीच भंगार ठेवू नका. अनेक लोकांना घरात वस्तू जमा करण्याची सवय असते. पण चुकूनही घरात कोणत्याही प्रकारचे भंगार जमा करू नका. यामुळे घरात नकारात्मकता पसरते. तुम्ही घराबाहेर यासाठी एक वेगळी भंगार खोली करू शकता.

  • तुटलेल्या देवी देवतांचे मुर्ती कधीच घरी ठेवू नका. त्या पवित्र पाण्यात विसर्जित करा. त्यामुळे घरात शांती आणि लक्ष्मीचा वास राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT