Assam Travel esakal
लाइफस्टाइल

Assam Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत फिरायला जायचंय? मग, आसाममधील 'या' सर्वोत्तम ठिकाणांना नक्की द्या भेट

Assam Travel : यंदाच्या उन्हाळ्यात जर तुम्ही देखील कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आसाम राज्य हे फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Assam Travel : मार्च महिन्यात मुलांच्या परीक्षा सुरू होतात आणि साधारणपणे एप्रिलपर्यंत या परीक्षा संपतात. त्यानंतर, मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मग फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवले जातात. यंदाच्या उन्हाळ्यात जर तुम्ही देखील कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आसाम राज्य हे फिरण्यासाठी सर्वोत्तम आहे.

मुलांसोबत फिरण्यासाठी आसाम राज्य हे सर्वोत्तम राज्य आहे. या राज्यात तुम्हाला अनेक पर्यटन स्थळी भेट देता येईल. पर्यटन स्थळांसोबतच येथे विविध प्रकारच्या राष्ट्रीय उद्यानांना तुम्हाला भेट देता येईल. या राष्ट्रीय उद्यानांमध्ये मुलांना हत्तीवरून जंगल सफारी देखील करता येईल.

तसेच, राष्ट्रीय उद्यानांमधील विविध प्रकारच्या वन्यजीवांना पाहण्याची संधी ही तुम्हाला मिळू शकेल. मुलांसोबतच संपूर्ण कुटुंबाला हे सर्व पहायला नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊयात आसाममधील या सर्वोत्तम ठिकाणांबद्दल.

नामेरी राष्ट्रीय उद्यान

नामेरी राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यातील सोनितपूर जिल्ह्यात स्थित आहे. या उद्यानापासूनचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे रंगपारा गुवाहाटी येथे आहे. या स्टेशनपासून उद्यानाचे अंतर हे २५ किमी आहे. त्यामुळे, रेल्वेमार्गाने तुम्ही या ठिकाणापर्यंत सहज पोहचू शकता. यासोबतच तुम्ही फ्लाईटने देखील या ठिकाणी जाऊ शकता. फ्लाईटने जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तेजपूर, कोलकाता किंवा सिलचर ही विमानतळे येथून जवळ आहेत.

या राष्ट्रीय उद्यानामध्ये हिमालयन ब्लॅक बेअर, रॉयल बेंगाल टायगर्स, वाईल्ड बोअर, स्किवरेल्स, वेदर हॉर्नबिल, रूफस नेकेड हॉर्नबिल आणि इबिसबिल यांसारखे विविध प्रकारचे पक्षी आणि वन्यजीव तुम्हाला या उद्यानात पहायला मिळतील. (Nameri National Park)

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. आसाममध्ये भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. या उद्यानाशिवाय आसामची ट्रीप ही अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला हत्ती, वाघ, चित्ता, हरिण यांसोबतच इतर अनेक प्राणी पहायला मिळतील.

विविध प्रकारच्या प्राण्यांसोबतच येथे तुम्हाला अनेक प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी जवळून पाहण्याची संधी मिळेल. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे जगभरात प्रसिद्ध आहे. (Kaziranga National Park)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा बदल? पेन्शनधारकांना मिळू शकते ४५ हजारांची किमान पेन्शन

Pune Stunt Video : पुण्यात परप्रांतीय तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा, दारूच्या नशेत भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी अन्... व्हिडिओ व्हायरल

CIDCO Housing Lottery: स्वातंत्र्य दिनानिमित्त ४,७७९ घरांची लॉटरी सिडकोची 'ईडब्ल्यूएस'साठी संधी

Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

SCROLL FOR NEXT