A beautifully decorated torana made of fresh mango leaves hanging at the entrance, symbolizing prosperity and positive energy during festive celebrations.

 

esakal

लाइफस्टाइल

Toran Decoration on Door : दिवाळीत दारावर तोरण बांधताय? मग जाणून घ्या, त्यात किती आंब्याची पानं लावणं आहे शुभ!

Meaning and Cultural Importance of Torana : आंब्याच्या पानांपासून बनवलेले तोरण केवळ सुंदरच दिसत नाही तर त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे.

Mayur Ratnaparkhe

Diwali Special Door Toran : सध्या सणासुदीचा काळ आहे, नवरात्र-दसरा पार पडले आहेत आणि आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. प्रत्येकाच्या घरात सजावटीची तयारी सुरू झाली आहे. दिवे, रांगोळीसह सणाच्या दिवशी घराच्या दारावर आंब्याच्या पानांचं तोरण बांधण्याची भारतीय परंपरा आहे. या दिवशी जवळपास सर्वचजण दारावर तोरण बांधतात, अनेकजण रेडीमेड तोरण बाजारातून आणतात, तर कित्येकजण आंब्याची पान आणून पारंपारिक पद्धतीनेच तोरण बांधतात.

 आंब्याच्या पानांपासून बनवलेले तोरण केवळ सुंदरच दिसत नाही तर त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. पण या तोरणामध्ये नेमकी किती आंब्याची पानं लावावीत याबाबत बहुतेक जणांना माहिती नाही. दारावर बांधल्या जाणाऱ्या आंब्याच्या पानांच्या तोरणाबाबतही शास्त्रानुसार काही नियम आहेत. किती पानं लावणं शुभ आणि किती पानं लावू नयेत याबाबत माहिती दिलेली आहे.

अशी माहिती समोर आली आहे की, वास्तुशास्त्र आणि हिंदू श्रद्धेनुसार, जर तुम्ही पानांच्या संख्येकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला अनवधानाने शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम अनुभवायला मिळू शकतात, ज्यामुळे घराच्या सुख आणि समृद्धीवर विपरीत परिणाम होवू शकतो.

आंब्याच्या पानांना सकारात्मक उर्जेचे आणि संपत्तीची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की तोरण घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश रोखते आणि शुभ शक्तींचे स्वागत करते. म्हणून, जेव्हा आपण तोरण बनवतो तेव्हा पानांची योग्य संख्या असणे महत्वाचे आहे जेणेकरून या शुभ शक्ती पूर्णपणे सक्रिय होतील.

तोरणात नेमकी किती पानं वापरावीत? -

वास्तुशास्त्रानुसार, दिवाळी तोरणात आंब्याची पाने विषम संख्येत वापरावीत. ही संख्या ५, ७ किंवा २१ असू शकते. ही आनंद आणि सौभाग्यकारक मानली जाते. तुम्ही ३ पानांचा गुच्छ बनवून तोरण देखील बनवू शकता. ७ किंवा ११ पाने सर्वात शुभ मानली जातात, म्हणून तुम्ही त्या संख्येची पानेही तोरणात वापरू शकता. तर तोरण बनवताना दोनच्या पटीत म्हणजेच २, ४, ६, ८, १०...इत्यादी संख्या असलेली पाने वापरणे टाळावे. कारण, हे अशुभ मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : ग्रीनलँडवरून अमेरिकेचा यु-टर्न, युरोपियन देशांवर टॅरिफ लादण्याची धमकी मागे, डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतला मोठा निर्णय ?

पाकड्यांनी हद्द ओलांडली! आशिया चषकातील 'हस्तांदोलन' प्रकरणावरून भारताचा अपमान केला; Viral Video ने संतापाची लाट...

Stock Market Today : सोन्याचे भाव घसरले पण शेअर बाजारात मोठी तेजी! सेन्सेक्सची तब्बल 800 अंकांची उसळी; कोणते शेअर्स वाढले?

Success Astrology: 23 जानेवारीपासून सोन्याचे दिवस! ‘या’ 3 राशींचे लोकं होतील धनवान, सूर्य-यम युती देणार मोठे यश

Manali Kshirsagar: राजकारण, दबाव संस्कृतीला थारा नाही: कुलगुरू मनाली क्षीरसागर, ‘चलता है’ संस्कृतीला पूर्णविराम!

SCROLL FOR NEXT