हजार्ड लाईट कधी वापरावेत Esakal
लाइफस्टाइल

Driving Tips: तुम्ही देखील पावसामध्ये कार चालवताना Hazard Light ऑन ठेवताय? मग जाणून घ्या योग्य माहिती

अनेक वाहन चालक मिळालेल्या चुकीच्या माहितीनुसार पावसात व्हिजिबिलीटी कमी असल्याने इतर वाहनांना आपल्या कारचा अंदाज यावा यासाठी हजार्ड लाइट्स सुरु ठेवतात. मात्र यामुळे इतर वाहनांना मदत होण्याएवजी धोका वाढू शकतो

Kirti Wadkar

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यांवर वाहनांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी मुख्य कारण म्हणजे व्हिजिबिलीटी Visibility कमी होणं. मुसळधार पाऊस पडत असताना किंवा ढग खाली उतरल्याने अनेकदा समोरचा रस्ता किंवा मागून येणारी वाहनं Vehicles स्पष्ट दिसत नाहीत. Travel Tips Marathi It it advisable to keep hazard lights of car on in Rains

तसंच रस्ता ओल्याने टायर्समधील Cay Tyres ट्रॅक्शन लूज होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठीच पावसाळ्यात Monsson काळजीपूर्वक वाहन चालवणं गरजेचं आहे. पावसाळ्यात अपघात होण्यामागे आणखी देखील काही कारणं जबाबदार असतात. ज्यापैकी एक म्हणजे ड्रायव्हिंग संबधीची चुकीची माहीती किंवा काही गैरसमज.

यापैकीच एक म्हणजे पावसात गाडी चालवताना हजार्डस् लाइट्स म्हणजेच चारही बाजुंचे इंडिकेटर सुरू ठेवणं.

पावसात हजार्ड लाइट सुरू ठेवावेत का?

अनेक वाहन चालक मिळालेल्या चुकीच्या माहितीनुसार पावसात व्हिजिबिलीटी कमी असल्याने इतर वाहनांना आपल्या कारचा अंदाज यावा यासाठी हजार्ड लाइट्स सुरु ठेवतात. मात्र यामुळे इतर वाहनांना मदत होण्याएवजी धोका वाढू शकतो.

तुमची कार तुम्ही थांबवून एका जागी पार्क केली आहे. ती सुरू होणार नाहीये, याची माहिती इतर वाहनांना देण्यासाठी हजार्ड लाइट्स सुरु केले जातात.

तसंच काही वेळेस पावसाळ्यात कार रस्त्यात मध्येच बंद पडू शकते. अशावेळी इतर वाहनांना सावध करण्यासाठी हजार्ड लाइट सुरू ठेवावी. जेणेकरून मागील वाहन सावनधाता बाळगून वाहन चालवेल.

हजार्ड लाइट हा इतर गाड्यांसाठी एक प्रकारचा संदेश आहे. यामुळे इतर गाड्यांना तुमची कार बंद आहे हे लक्षात येईल आणि टक्कर होवू नये म्हणून त्या मार्ग बदलतील.

हे देखिल वाचा-

हजार्ड लाइटचा अयोग्य वापर

अनेकजण मात्र हजार्ड लाइट्सचा अयोग्य वापर करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका जास्त असतो. धुकं किंवा मुसळधार पावसात हजार्ड लाइट्स सुरु करण्याएवजी फॉग लॅम्प किंवा हेडलॅम्प सुरू करावेत. ज्यामुळे इतर गाड्यांना तुमच्या गाडीचा अंदाज येईल.

तसंच तुमची कार इतर वाहनांसाठी जास्त व्हिजिबल व्हावी यासाठी हेडलॅम्प लो बीमवर असतील याची दखल घ्या.

हजार्ड लाइट्सचा अयोग्य वापर केल्यास दंड

कार चावताना अचानक विनाकारण हजार्ड लाइट ऑन केल्यास इतर वाहनांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. समोरील वाहन थांबणार आहे किंवा थांबलेले आहे असं मागून येणाऱ्या वाहन चालकाला वाटू शकतं. यामुळे अपघात होण्याचा धोका अधिक असतो.

मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ नुसार, हजार्ड लाइटचा गैरवापर करणे हा दंडनीय गुन्हा आहे. यासाठी तुम्हाला ३०० रुपयांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. अनेक राज्यांमधील पोलिस हजार्ड लाइटचा गैरवापर करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे जर तुम्हाला देखील दंड लागू नये अशी इच्छा असेल तर हजार्ड लाइटचा योग्य वापर सुरू करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT