Valentine Day 2024  esakal
लाइफस्टाइल

Valentine Day 2024 : ‘केरला स्टोरी’ वरून वातावरण तापलं असताना मी भावाच्या मुस्लिम मित्रासोबत पळून जाऊन लग्न केलं’

अश्विनी आणि जहिरच्या घरावर हल्ला ही करण्यात आला

Pooja Karande-Kadam

Valentine Day 2024 :

जगातला कोणताही व्यक्ती पहिलं प्रेम विसरू शकत नाहीत. कारण ते बालिश वयातलं असतं. त्या प्रेमात ना जात आडवी येते ना जोडीदाराची आर्थिक परिस्थिती. आजच्या व्हॅलेंटाईन स्पेशल प्रेमकथेतील जोडपंही जरा स्पेशल आहे. कारण, या दोघांनी केवळ प्रेम केलं. ज्या प्रेमाला कसलेच बंधन नाही.

ही कथा आहे छत्रपती राजर्षी शाहु महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरातील. जिथ जाती-पातीला थारा नाही. अशाच या कोल्हापुरात राहणाऱ्या एका अश्विनी नावाच्या मराठी जातीय मुलीची. आणि जहिर नावाच्या मुस्लिम मुलाची. (नावे बदललेली आहेत)

अश्विनी जेव्हा नववीच्या वर्गात शिकत होती. तेव्ह जहीर तिच्या भावाचा मित्र. बालिश वयात जहीर तिला आवडू लागला. भावाचा धाक होताच पण तरीही ती त्याच्याशी सर्व काही बोलू लागली. काही अडचणी आल्या तर हक्काने त्याला सांगू लागली. त्यातच ती त्याच्या प्रेमात पडली अन् त्यालाही तिचा सहवास, बोलणं, तिच काळजी घेणं आवडू लागलं. हे प्रेम वय वाढेल तसं वाढतंच गेलं.

जेव्हा ते लग्नाच्या योग्यतेचे झाले तेव्हा त्यांनी याबद्दल घरी सांगण्याचा निर्णय घेतला. पण जात मध्ये येईल, विरोध होईल यामुळे घाबरून त्यांनी कोर्टात रजिस्टर मॅरेज केलं अन् मग घरी फोन केले. घरच्यांना हे मंजूर नव्हतं. घरचे लोक आधी म्हणाले गावात राहू देणार नाहीत लोक, तुम्ही लग्न केलंय पण ते मोडा आणि घरी परत या. पण, त्यांना याची अपेक्षा होतीच त्यामुळे त्यांनी नकार दिला. अन् ते गाव, शहरापासून दूर जाऊन भाड्याच्या खोलीत राहू लागले.

या लग्नानंतर पाचव्याच दिवशी मुलीच्या घरच्यांनी त्यांना स्विकारलं. त्यांना येऊन भेटले अन् त्यांच्या संसारासाठी हातभार लावला. यानंतर मुलाच्या वडिलांचे गॅरेज होते. त्यात तो मुलगा काम करायचा. पण, मुलाच्या वडिलांचा अपघात झाला अन् त्यांनीही या दोघांना स्विकारलं.

गावी परतून गल्लीतच त्यांनी भाड्याने रूम घेऊन ते नव्याने संसाराला लागले. घरकामात अश्विनी गुंतली तर जहिरही वडिलांच्या कामात हातभार लावू लागला. त्यांच हे लग्न घरच्यांनी मान्य केलं होतं. पण, काही समाजकंटक लोक असतात की, ज्यांना हे पाहवलं नाही.

काही लोकांच्या मते आजही हिंदू-मुस्लिम विवाह करणं गुन्हा आहे, त्यांनी अश्विनी आणि जहिरला त्रास देण्याचाही प्रयत्नही केला. त्यांच्या घरावर हल्ला ही करण्यात आला. दारावर मोठ-मोठ्या आवाजात येणाऱ्या हाका, लाथा यांचा आवाज ऐकून अश्विनी घाबरली. तिने सासरे अन् पाहुण्यांना फोन केला की असे लोक आले आहेत. तेव्हा सासारे धावतच तिच्या घरी आले अन् आवाज दिल्यावर ते लोक पळून गेले.

या प्रकारानंतर स्वत:च गाव सोडून अश्विनी आणि जहिर यांनी नव्या गावात संसार थाटला. तिथे जहिर दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये जाऊन काम करतो. तर, अश्विनी घरकाम करते. जेव्हा अश्विनीला विचारलं की परिणाम माहिती असताना तू हा निर्णय का घेतला. तर ती म्हणते, मला लग्न अशा व्यक्तीसोबत करायचं होतं जो मला समजून घेईल, साथ देईल. जोडीदाराची ती छटा मला जहिरमध्ये मिळाली.

मी स्वखुशीने मुस्लिम धर्म स्विकारला असून आता मोबाईवर पाहून नमाज पठण, अन् देवाच्या बाकी गोष्टीही करते. याबद्दल मला कोणीही दबाव टाकला नाही तर कोणीही सांगितलं नाही. मी माझ्या मर्जीने केले. आम्ही प्रेमाला सर्वकाही मानलं आहे. आमच्या घरच्यांचाही सपोर्ट आहे यासाठी. त्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत, असे अश्विनी सांगते.                 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT