Valentine Day 2024  esakal
लाइफस्टाइल

Valentine Day 2024 : इथं लोक स्वत:च स्वत: चा व्हॅलेंटाईन बनतात,वाचा व्हॅलेंटाईन डेशी संबंधित खास गोष्टी

व्हॅलेंटाईन डेला जवळपास 1 अब्ज कार्ड विकले जातात

Pooja Karande-Kadam

Valentine Day 2024 :

व्हॅलेंटाईन डे हा प्रत्येकासाठी खूप खास असतो. लोक त्यांच्या प्रेमाच्या जोडीदारासोबत मनापासूनच्या भावना शेअर करतात आणि त्यांच्यासाठी हा खास दिवस आणखी खास बनवण्याचा प्रयत्न करतात.

रोममधील संत व्हॅलेंटाइनच्या स्मरणार्थ या दिवसाची सुरुवात झाली आणि आज हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवसाच्या सुरुवातीची कथाच लोकांच्या मनाच्या अगदी जवळ आहे, असे नाही तर व्हॅलेंटाईन डेशी संबंधित काही गोष्टीही खूप रंजक आहेत.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर किंवा मैत्रिणीला लाल गुलाब किंवा भेटवस्तूद्वारे प्रपोज करतात आणि त्यांच्यासोबत काही वेळ घालवतात. हा दिवस काहींसाठी आनंदाने भरलेला असताना, काहींसाठी तो हृदय तोडण्याचाही ठरू शकतो. सध्या प्रेमी युगुलांसाठी खास असलेल्या व्हॅलेंटाईन डेशी संबंधित काही गोष्टी फारच रंजक आहेत. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

फिनलंडमध्ये या दिवसाला मैत्रीचे नाव देण्यात आले आहे

फिनलंड हा एक असा देश आहे जिथे व्हॅलेंटाईन डे फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो आणि लोक गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला नाहीतर त्यांच्या बेस्ट मित्रांना भेटवस्तू देतात.

इथं मुली देतात चॉकलेट

जपानमध्ये व्हॅलेंटाइन डे वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. खरं तर, जगभरात केवळ मुलंच मुलींना गिफ्ट देतात असे समजले जाते. पण या देशात मुली मुलांना इंप्रेस करण्यासाठी चॉकलेट देतात. तसेच लोक आवडत्या व्यक्तीला निनावी पत्र लिहीतात.

पाळीव प्राण्यांना भेटवस्तू देतात

जगभरात पाळीव प्राणी प्रेमींची कमतरता नाही. जरी लोक आपल्या जोडीदारांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, परंतु माहितीनुसार, सुमारे 3 टक्के लोक असे आहेत जे आपल्या पाळीव प्राण्यांना भेटवस्तू देतात. त्यांच्यावरच आपले प्रेम व्यक्त करतात.

1 अब्ज कार्ड्सची देवाणघेवाण होते

व्हॅलेंटाईन डे निमित्त अनेक लोक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कार्ड्सची देवाणघेवाण करतात. काही लोक स्वतःच्या हाताने कार्ड बनवतात, तर मोठ्या संख्येने लोक कार्ड खरेदी देखील करतात. माहितीनुसार, व्हॅलेंटाईन डेला जवळपास 1 अब्ज कार्ड विकले जातात.

स्वत: लाच फुले देतात

अमेरिकेतही लोक व्हॅलेंटाइन डे मोठ्या थाटात साजरा करतात. व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रेम व्यक्त करणं, लाडक्या व्यक्तीला गिफ्ट देणं, तिच्यासोबत वेळ घालवणं आवडतं. पण अमेरिकेत जवळपास 15 टक्के लोक स्वत:चा व्हॅलेंटाइन बनवतात आणि स्वत:ला फुले आणि इतर गिफ्ट देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

Success Story: रोज आठ ते दहा आभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT