Valentine Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Valentine Day 2024 : जोडीदाराला ‘हे’ खास गिफ्ट्स देऊन, साजरा करा ‘व्हॅलेंटाईन्स डे’

‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्या निमित्ताने अनेक कपल्स एकमेकांना सुंदर गिफ्ट्स देतात. हे गिफ्ट्स देखील स्पेशल असावेत, असे अनेकांना वाटते.

Monika Lonkar –Kumbhar

Valentine Day 2024 : जगभरात १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन डे च्या आठवडाभर आधी विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात.

जवळपास आठवडाभर हे दिवस सेलिब्रेट करून प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो. हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी अनेक कपल्स वेगवेगळे प्लॅन्स बनवतात आणि आपल्या जोडीदाराचे मन जिंकून घेतात.

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने अनेक कपल्स एकमेकांना सुंदर गिफ्ट्स देतात. हे गिफ्ट्स देखील स्पेशल असावेत, असे अनेकांना वाटते. आजच्या या स्पेशल दिवशी जोडीदाराला सुंदर गिफ्ट देण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर त्यासाठीचे काही गिफ्ट ऑप्शन्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्किनकेअर गिफ्ट

स्किनकेअर गिफ्ट हे आपल्या जोडीदाराला आवडेल की नाही, अशी शंका अनेकांना असते. मात्र, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या स्किनकेअर गिफ्टचा समावेश आपल्या रोजच्या आयुष्यात असतो. ही स्किनकेअर उत्पादने आपण त्वचेसाठी हमखास वापरतो.

त्वचेची काळजी घेण्यासाठी या स्किनकेअर गिफ्टपेक्षा दुसरा चांगला पर्याय तुम्हाला शोधून सापडणार नाही. त्यामुळे, तुमच्या जोडीदाराच्या त्वचेला सूट होतील, असे स्किनकेअर गिफ्ट तुम्ही नक्कीच देऊ शकता. यामुळे, तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश होईल, यात काही शंका नाही.

कपल रिंग्स

‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्या दिवशी जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अंगठीपेक्षा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या हातात सुंदर अंगठी घालून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

मनातील भावना व्यक्त करण्याचा हा एक सुंदर पर्याय आहे. जर तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काय गिफ्ट घ्यावे? असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, तर कपल रिंग्स हा एक चांगला गिफ्ट ऑप्शन आहे.

पर्सनलाइज्ड गिफ्ट्स

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आतापर्यंत घड्याळ, कपल रिंग्स, स्किनकेअर उत्पादने इत्यादी अनेक प्रकारचे गिफ्ट्स दिले असतील आणि आजच्या दिवशी काय द्यावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर पर्सनलाइज्ड गिफ्ट्स हा बेस्ट ऑप्शन आहे. आजच्या दिवशी तुम्ही या प्रकारचे गिफ्ट तुमच्या पार्टनरला देऊ शकता.

पर्सनलाइज्ड गिफ्टसमध्ये तुम्ही तुमच्या दोघांची एखादी सुंदर फोटो फ्रेम किंवा कॉफी मग देऊ शकता. त्यासोबतच कुशन कव्हर, फोटो लॅम्प, नेम पेंडेंट्स यावर ही तुमचा फोटो लावून हे पर्सनलाइज्ड गिफ्ट तुम्ही नक्कीच देऊ शकता. हा एक वेगळा आणि हटके गिफ्ट ऑप्शन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT