love day
love day 
लाइफस्टाइल

Valentine Day Special: तिला विचारायचं धाडस करायला हवं होतं!

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

सलग पाचव्या दिवशी तो तिला भेटत होता. संध्याकाळी सात वाजता अलका बसस्टॉपवर कोथरुडला जाणारी बस पकडण्याच्या घाईत ती असायची. चार दिवसांपूर्वी ती त्याला इथंच दिसली होती. बारावी संपल्यानंतर तो तिला पहिल्यांदाच पाहत होता. मधे पाच वर्षांचा कालावधी लोटला असला तरी पाहताच क्षणी त्याने तिला ओळखलं होतं. पण तिने ओळखलं नाही तर उगाच अपमान नको म्हणून तो बोलावं की नाही या संभ्रमात होता. पण 'ना अपमान का भय, ना सन्मान की इच्छा' हे कुठल्यातरी पुस्तकातले शब्द त्याला आठवले आणि त्याने मनाची तयारी केली.

Valentine week special: आता त्याने एकट्याने जाण्याचं ठरवलं होतं..

कळायला लागल्यापासून त्याचं हे पहिलं प्रेम होतं. कॉलेजात ते एकाच क्लासमध्ये होते. ती दिसायला सुंदर होतीच पण तिच्या हसण्यावर तो घायाळ झाला होता. तिच्याकडे चोरून पाहणं आणि ती पाहताच नजर जमिनीकडे जाणं हे त्याचं नेहमीचं झालं होतं. दिवस रात्र तो तिचाच विचार करायला लागला होता. इतिहासाच्या तासाला तो भविष्याचे स्वप्न पाहू लागला होता. पण तिच्या मनात काय चालू आहे हे त्याला शेवटपर्यंत कळलं नाही. तिला बोलण्याचंही धाडस याला कधी झालं नाही. बोलण्याचा प्रयत्न करावा म्हटलं तर कोणी तोंडात बर्फाचा तुकडा ठेवल्यासारखं त्याला वाटायचं. बारावी संपली पण याची गाडी कधी पुढे गेलीच नाही. दोघांचेही मार्ग बदलले पण त्याच्या मनात पहिल्या प्रेमाची आठवण कायम राहिली.

या पाच वर्षाच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. पण त्याचं पहिलं प्रेम तो विसरू शकला नव्हता. अजूनही त्याला तिचीच स्वप्नं पडायची. तिच्यावर मरण्याची धुंदी त्याच्या डोक्यातून कधी गेलीच नव्हती. आणि अचानक इतक्या वर्षांनी ती त्याला दिसली. बसची वाट पाहणाऱ्या तिच्यासमोर तो जाऊन उभा राहिला. तो काही बोलण्याच्या आतच तिने त्याचं नाव घेत त्याला ओळख दिली. या अनपेक्षित प्रकारामुळे तो थक्कच झाला. शिवाय त्याला सुखद धक्काही बसला. दोघांचं बोलणं सुरु होत असतानाच तिची बस आली. उद्या इथेच भेटायला ये असं म्हणत ती निघून गेली.

संबंध रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. तिच्या भेटीसाठी तो बेचैन तर झाला होताच पण तिने नावानिशी ओळखल्याने तो भलताच विचारात पडला. कॉलेजमध्ये असताना कधी एका शब्दानेही बोलणं झालं नसताना, शिवाय मधे पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला असताना तिला आपलं नाव लक्षात राहावं याचं त्याला नवल वाटत होतो. उद्याच्या भेटीची तो आतुरतेने वाट पाहत होता.

ठरल्याप्रमाणे बसस्टॉपवर त्या दोघांची भेट झाली. त्याच्याकडे सांगण्यासारखं खूप काही होतं, पण तो गप्प होता. कारण तीच खूप काही बोलत होती. कॉलेजचे दिवस, मित्र मैत्रिणी अशा सर्व आठवणी ती सांगत होती. हे सांगत असताना तिचं हसणं त्याला खूप गोड वाटत होतं. तिला असच ऐकत राहावं असं त्याला वाटू लागलं.

पुढचे तीन दिवस ते असंच भेटत राहीले. मात्र, सतत झुरत बसण्यापेक्षा तिला मनातलं सगळं सांगून टाकावं असं त्यानं मनाशी पक्कं केलं. पाचव्या दिवशी तिला जास्त काही बोलण्याची संधी न देता त्याने मन मोकळं केलं.

"कॉलेजमध्ये असल्यापासून तू मला आवडत आली आहेस... तुला हे सांगण्याचं मला कधी धाडस झालं नाही... पण खरं सांगतो अजूनपर्यंत तुच माझा मनात आहेस."

त्याच्या या बोलण्याने ती स्तब्ध झाली. थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. नंतर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात चर्रर झालं. आपण तिला दुखावलं असं वाटून तो तिची माफी मागू लागला. तेव्हा कापऱ्या आवाजात ती म्हणाली...

"तुला मी आवडते हे मला कॉलेजमध्ये असतानाच कळालं होतं. तूही मला आवडायचास. पण तू कधीच मला बोलला नाहीस. आणि मलाही तुला बोलायचं धाडस झालं नाही. आज इतक्या वर्षांनी तू मला बोलत आहेस पण आता खूप उशीर झालाय. माझं लग्न ठरलंय..."

तिच्या या बोलण्याने त्याला पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला. जिच्यासाठी तो इतके दिवस झुरत होता, तिही त्याच्यासाठी झुरत होती. पण न केलेल्या धाडसाची किंमत ते दोघं भोगणार होते.

तिची बस आली. त्याचा निरोप घेत ती गाडीत बसली. कदाचित तो शेवटचा निरोप असणार होता. जाणाऱ्या बसच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला

"आजचं धाडस करायला नको होतं"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT