Valentine's Day Special Article esakal
लाइफस्टाइल

Valentine's Day : 'ती'च्या डोळ्यांनी 'तो' अनुभवतो प्रेमाचे रंग; 9 वर्षांच्या संसारात मयुरीची 'दीपक'ला डोळस साथ

कोल्हापुरात येऊन त्यांनी १० जूनला म्हणजेच दृष्टीदान दिनादिवशीच लग्नगाठ बांधली. मयुरीने खऱ्या अर्थाने दीपक यांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी केली.

नंदिनी नरेवाडी

जन्मभर सोबत राहण्याचे वचन देताना वधू-वर दोघांकडूनही अपेक्षा व्यक्त केल्या जातात. त्यातील एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तरी देखील ते स्थळ नाकारले जाते.

कोल्हापूर : ‘तो’ संगीत शिक्षक (Music Teacher) पण दृष्टीहीन. ‘ती’ सर्वार्थाने डोळस. मात्र, या अंधकारमय आयुष्यात ‘ती’च्या येण्याने प्रेमाचे रंग अवतरले आणि त्याच्या संगीताला नवे सूर लाभले. त्यांचा नऊ वर्षांचा संसार आता बहरला असून संसारवेलीवर एक गोंडस कळीदेखील उमलली आहे. कोल्हापूरच्या दीपक सूर्यवंशी (Deepak Suryavanshi) आणि शिर्डीतील मयुरी कुलकर्णी (Mayuri Kulkarni) यांची ही प्रेमकथा.

जन्मभर सोबत राहण्याचे वचन देताना वधू-वर दोघांकडूनही अपेक्षा व्यक्त केल्या जातात. त्यातील एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तरी देखील ते स्थळ नाकारले जाते. मात्र, दृष्‍टिहीन असलेल्या संभाजीनगर येथील दीपक यांना शिर्डीच्या मयुरी यांनी डोळस साथ देत प्रेमाचे (love) ऋणानुबंध घट्ट केले आहेत. दीपक यांना संगीताचे ज्ञान आहे. संगीत विषय शाळांमध्ये शिकवतानाच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले आहे.

खरेतर जन्मतःच ते दृष्‍टिहीन नव्हते. मात्र, वयाच्या विसाव्या वर्षांपासून दृष्टी कमकुवत होऊ लागली आणि नियतीच्या फटकाऱ्यात दृष्टी गेली. अशाच परिस्थितीत दहा वर्षांपूर्वी दीपक नोकरीनिमित्त शिर्डीतील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये रुजू झाले. तेथेच शिक्षण घेणाऱ्या मयुरी यांना संगीत शिकवतानाच दोघांची घट्ट मैत्री झाली. दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला. जन्मभर सोबतीने राहिल्यास सुखच अनुभवता येईल, याची प्रचिती मिळू लागली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मयुरीच्या घरातून सुरुवातीला थोडा विरोध झाला.

कोल्हापुरात येऊन त्यांनी १० जूनला म्हणजेच दृष्टीदान दिनादिवशीच लग्नगाठ बांधली. मयुरीने खऱ्या अर्थाने दीपक यांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी केली. दीपक यांच्या घरातून त्यांच्या नात्याला होकारच होता. मयुरीच्या आई-वडिलांनी देखील वर्षभरातच हे नाते स्‍वीकारले आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे वारे वाहू लागले. दोघांनाही संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी त्यांचे कौशल्य जाणत नोकरीची संधी दिली. त्यांच्या संसाराची घडी व्यवस्थित बसली. त्यांना एक कन्या झाली असून, ती बालवाडीत शिकते आहे.

आज रंगणार प्रेमोत्सव

दरम्यान, बुधवारी (ता. १४) व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) निमित्ताने प्रेमोत्सव रंगणार आहे. यानिमित्ताने भेटवस्तूंची लयलूट होईल. शहरात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटनी व्हॅलेंटाईन पार्टीसोबत कपलसाठी कँडल लाईट डिनरचे आयोजन केले आहे. त्यासाठी विविध सवलतींचा वर्षाव केला आहे. तसेच काही संस्थांनी या दिनाचे औचित्य साधत सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT