कुठल्या दिशेला बसून करावा अभ्यास Esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips या दिशेला बसून कराल अभ्यास तर रट्टा मारण्याची गरजंचं नाही

जर मुलांसाठी वेगळी रुम किंवा स्टडी रुम असेल तर अभ्यासाला बसण्याची दिशा, पुस्तकांचं कपाट नेमकं कुठे असावं यासाठी वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत. जाणून घेऊयात हे नियम

Kirti Wadkar

आपली मुलं अभ्यासात हुशार असावी त्यांना चांगले गुण मिळावे अशी प्रत्येत पालकाची इच्छा असते. यासाठी अनेक पालक मुलांच्या अभ्यासामध्ये Study वेळोवेळी लक्ष देतात. तर काही दिवसभर मुलांमागे अभ्यास करण्याचा तगादा लावतात. Vastu Tips Marathi what direction children should sit to improve in studies

काही मुलांना अनेक तास अभ्यास करूनही त्यांना पुरेसं यश Success किंवा चांगले गुण मिळत नाहीत. काही मुलांना मन एकाग्र Concentration करण्यास अडचणी येतात. अभ्यास लक्षात राहत नाही. यासाठीच पालकांनी मुलांच्या अभ्यासाच्या दिशेची योग्य निवड करणं गरजेचं असल्याचा सल्ला वास्तू शास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

जर मुलांसाठी वेगळी रुम किंवा स्टडी रुम असेल तर अभ्यासाला बसण्याची दिशा, पुस्तकांचं कपाट नेमकं कुठे असावं यासाठी वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत.

अभ्यास करण्यासाठी ही दिशा योग्य

वास्तू शास्त्रानुसार मुलांच्या पुस्तकांचं कपाट किंवा बुक स्टॅण्ड हा स्टडी रुम किंवा त्यांच्या खोलीत पश्चिम दिशेला असावा. पश्चिमेस पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास ते थोड दक्षिणेला तुम्ही सरकवू शकता.

तसंच अभ्यास करताना मुलांचं तोंड पूर्व दिशेला असेल अशा प्रकारे टेबल किंवा इतर व्यवस्था करावी. जर पूर्वेला अशी सोय करणं शक्य नसेल तर उत्तर-पूर्व दिशेला देखील अभ्यासासाठी बसू शकता. यामुळे मुलांचा अभ्यासातील गुंता सुटण्यास मदत होईल आणि त्यांना ज्ञान ग्रहण करण्यास सोप जाईल.

तसंच अभ्यासाला बसताना मुलाची पाठ ही कायम खिडकी किंवा दरवाजाकडे असावी. वास्तू शास्त्रामध्ये अभ्यासाच्या टेबलाबद्दलही सांगण्यात आलंय. वास्तू नुसार अभ्यासाचं टेबल हा कायम चौरस असावं.

हे देखिल वाचा-

अभ्यासाच्या खोलीचा रंग

वास्तूशास्त्रानुसार मुलांच्या खोलीचा किंवा स्टडीरुमचा रंग देखील महत्वाचा ठरतो. मुलांसाठी वेगळी स्टडी रुम नसेल तर त्यांच्या खोलीमध्ये योग्य रंग असणं गरजेचं आहे. यासाठी खोलीचा रंग हलका पिवळ, हलका गुलाबी किंवा हलका हिरवा असावा.

पिवळा रंग हा विद्येचा रंग मानला जातो तर हिरवा रंग हा बुद्धीच्या देवतेचा मानला जातो. हे रंग निवडल्याने मुलाची बौद्धिक क्षमता वाढते आणि त्याची स्मरणशक्ती सुधारते.

अभ्यासाच्या खोलीत लावा पोस्टर

मुलं जिथं अभ्यासाला बसतात तिथे सकारात्मक वातावरण Positivity निर्माण करणं गरजेचं आहे. यासाठीच स्टडीरुम किंवा मुलांच्या खोलीत काही पोस्टर किंवा पेंटिंग्स लावा. यामध्ये तुम्ही काही पॉजिटिव्ह थॉट्स किंवा कोट्स असलेले पोस्टर किंवा काही अभ्यासाची संबंधीत चार्टस् लावू शकता.

तसंच मुलांच्या खोलीत उगत्या सुर्याचं पोस्टर किंवा पेंटिग तसंच धावणारे घोडे किंवा वृक्ष असलेले पोस्टर आणि पेंटिंग लावू शकता. त्याचसोबत काही महान व्यक्तींचे किंवा खेळाडूंचे फोटो देखील तुम्ही लावू शकता.

इतर टीप्स

- अभ्यासाच्या खोलीत श्रीगणेशाची प्रतिमा किंवा फोटो ठेऊन मुलांना रोज त्यास वंदन करण्यास सांगावं. यामुळे मुलांच्या बौद्धीक क्षमतेत वाढ होते.

- अभ्यासाची खोली किंवा जागा ही कायम स्वच्छ असावी. पुस्तक किंवा अभ्यासाचं साहित्य विखुरलेलं नसावं.

- मुलांच्या स्टडीरुम शेजारी किंवा अभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी शौचालय नसेल याची काळजी घ्या.

अशा वास्तूशास्त्रात सांगण्यात आलेल्या काही गोष्टींची दखल घेतल्यास तुमच्या मुलाचं अभ्यासात मन रमेल तसंच त्याची बौद्धीक क्षमता चांगली होईल.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT