Wedding Shopping In Pune esakal
लाइफस्टाइल

Wedding Shopping In Pune : लग्नात पुणेरी फेटा अन् पेशवाई नऊवारीचाच स्वॅग; ट्रेंडी फॅशनसाठी इथूनच करा स्वस्तात मस्त शॉपिंग!

पुण्यात स्वस्तात मस्त लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर कुठं जावं

Pooja Karande-Kadam

Wedding Shopping In Pune : लग्न कुठलंही असो खरेदी तर भरभरून केली जाते. आत्या, मावशी, मावशीची मुलगी,, आत्याचा जावई, जावयाचा भाऊ, वधु वर, वराची मामे बहीण यासारख्या अनेक लोकांना नवे कपडे घ्यावे लागतात. यांच्यासोबत आहेरात दिल्या जाणाऱ्या करकरीत साड्या, वधु-वराचे कपडे, अशी सगळीच खरेदी केली जाते.

वधु वरासाठी 'पुणेरी पगडी' आणि पेशवाई नऊवारी घेतली जाते. पुणेरी स्टाईल करायची तर पुण्यातच जाऊन खरेदी केली पाहिजे. होय ना, म्हणूनच आज पुण्यातील काही फेमस होलसेल मार्केटची माहिती घेऊयात.

पुण्यात तुम्हाला पारंपरिक दागिने, लग्नासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी जसं पुणेरी पगडी, सोवळं, रूखवताच्या गोष्टी आणि नऊवारी साड्या यांची भरपूर व्हरायटी उपलब्ध होते.

पुण्यात काही दुकान आहेत जी वर-वधू दोघांच्याही शॉपिंगसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन अशी आहेत त्यात पेशवाई क्रिएशन, गलानी फॅशन्स, कासट, कजरी सारीज, वामा, स्वामिनी साडी सेंटर अशा अनेक दुकानांचा समावेश आहे. येथे पारंपरिक साडी पासून जरी वर्कचे रिच लेहेंगा सगळ्या प्रकारातील कपडे मिळतात.

मनिष मार्केट

पुण्यात स्वस्तात मस्त लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर रविवार पेठेत असलेल्या मनिष मार्केटला भेट दिलीच पाहिजे. कारण इथे अगदी ५० रूपयांपासून कपडे मिळतात. यामध्ये आहेराच्या साड्या, वधु वराचे फॅन्सी कपडे, अगदी मानपानाचे टॉवेल टोपी आणि फेटेही स्वस्त दरात मिळतात.  

लक्ष्मी रोड 

लक्ष्मी रोड हा पुण्याचा जगण्याचा रस्ता आहे. पुण्यात खरेदीच्या बाबतीतही हे लोकांच्या सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. लक्ष्मी रोड हा अलका टॉकीज स्क्वेअरपासून सुरू होतो आणि पुण्यातील शहराच्या मध्यभागातून जातो.या रोडवर नेहमीच वर्दळ दिसते.

गजबजलेल्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी झाकलेली दुकाने असलेला रस्ता सुमारे 4 किमी चालतो. हे कापड आणि कपड्याच्या दुकानांच्या विविधतेसाठी ओळखले जाते. तुम्ही होलसेल खरेदीसाठी इथं नक्कीच भेट देऊ शकता.

प्रत्येक लग्नाच्या सिझनमध्ये वेगळी फॅशन येते.ती प्रत्येक फॅशन तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील. या रोडवरील जयहिंद, मेन्स अव्हेन्यू, सजावट आणि दुल्हन सारखी काही दुकाने त्यांच्या स्टॉक आणि नवीनतम डिझाइनसाठी प्रसिद्ध आहेत.

जर तुम्हाला कमी किंमतीत चांगली व्हरायटी असलेली फॅशन तुम्हाला नक्कीच उपलब्ध होईल. कपड्यांच्या दुकानांव्यतिरिक्त तुम्हाला रस्त्यावर दागिन्यांची अनेक दुकाने दिसतात.

प्रत्येक फॅशन तुम्हाला या मार्केटमध्ये मिळेल

फुरसुंगी, हडपसर

हडपसर फुरसुंगी येथेही लेडीज साड्या रेडिमेड लेडीज गारमेंट चे मोठमोठे गोडाऊन आहेत हडपसर फुरसुंगी येथे तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होसलेस कपडे मिळतील. इथे तुम्हाला जेन्ट्ससाठी लागणारे कपडे स्वस्तात मिळतात. अगदी ७५ रूपयांपासूनही शर्ट, पॅन्ट मिळतात.

हाँगकाँग लेन

हाँगकाँग लेन पिशव्या, वधु वरांचे कपडे, सामान, पादत्राणे इत्यादींसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. येथे तुम्ही अगदी कमी किमतीत चांगली खरेदी करू शकता. येथे तुम्ही खूप कमी किमतीत मोठ्या प्रमाणात साड्या खरेदी करू शकता. या मार्केटमध्ये अशी अनेक दुकाने आहेत जिथून तुम्ही वधूसाठी डिझायनर लेहेंगा आणि वरासाठी डिझायनर शेरवानी अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

येथे तुम्ही ब्रँडेड लेहेंगा आणि शेरवानी देखील कमी किमतीत खरेदी करू शकता. पुण्यातील डेक्कन जिमखानाजवळ पुलाची वाडी येथे हे मार्केट आहे.

एफसी रोड

पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज समोरच्या रस्त्यावर हे मार्केट आहे. तरुण-तरुणींमध्ये अतिशय लोकप्रिय असणारे हे मार्केट कायमच अतिशय गजबजलेले असते.

निरनिराळी हॉटेल्स आणि कॅफे, रस्त्यावर असलेले फूड जॉइंट्स, अद्ययावत कपडे आणि ॲक्सेसरीजची दुकाने, पुस्तकांची दुकाने यांनी हे मार्केट सतत फुललेले असते. खिशाला परवडतील अशा किमतीत उत्तमोत्तम वस्तू मिळवण्याचे हे एक ठिकाण आहे आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बार्गेनिंग करू शकत असाल तर हे मार्केट तुमच्यासाठी अगदी योग्य आहे.

FC Road लाही तुम्हाला वेगळी व्हरायटी पहायला मिळेल

या ठिकाणीही नक्की जा

लक्ष्मी रोड, तुळशीबाग मार्केट आणि हाँगकाँग लेन व्यतिरिक्त, पुण्यात इतर अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही अगदी स्वस्त दरात लग्नाची खरेदी सहज करू शकता. होय, फॅशन स्ट्रीट रोड, जुना बाजार, एफसी रोड मार्केट आणि बाजीराव रोड ही पुण्यातील काही ठिकाणे आहेत जिथून तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीत वधू-वरांसाठी लेहेंगा आणि शेरवानीसह साड्या खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT