Weight Loss Diet esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Diet : वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे मेथी, पण कडवट मेथी खावी कशी?

मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते

सकाळ डिजिटल टीम

Weight Loss Diet :

वजन कमी करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो. तेव्हा तो व्यक्ती मेथीच्या बियांचे महत्त्व सांगतो. मेथीच्या बिया भिजवून चावून खाल्ल्याने वजन कमी व्हायला मदत होते. लोक उत्साहाने एखाद्या दिवशी हा प्रयोग करतात. पण मेथीची चव पाहूनच दुसऱ्या दिवशीची मेथी बी भिजवायचेच विसरतात.

मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. मेथीमध्ये तांबे, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी6, सी, के, कॅल्शियम, लोह आणि फॉलिक ॲसिडही चांगल्या प्रमाणात असते. Weight Loss Tips

मेथीमधील गुणधर्म तुमच्या वजनाला कंट्रोल करण्यासाठी मदत करतात. पण मेथी अति कडवट असते. त्यामुळे ती खाण्याचा फार कोणी विचार करत नाही. त्यामुळेच गुणकारी मेथी कशी खायची हे पाहुयात.

मेथीचे पाणी

तुम्ही वजन कमी करण्यासाठी सकाळी डिटॉक्स वॉटर पित असाल. तर रात्रभर मेथी एका ग्लासमध्ये भिजत ठेवा. सकाळी हेच पाणी उकळून तुम्ही पिऊ शकता. मेथी भिजल्याने तिच्यातील कडवटपणा थोडा कमी होतो. त्यामुळे हे पाणी उकळून त्यामध्ये मध घालून तुम्ही त्याचे सेवन करू शकता.  (Methi Seeds)

मेथीचा चहा

ज्याप्रमाणे मेथीच्या दाण्यांपासून पाणी बनवलं जातं, त्याच प्रकारे मेथीचा चहा बनवला जातो. भांड्यात मेथीचे दाणे टाका आणि पाण्याने चांगले उकळा. पाणी पूर्णपणे उकळल्यावर ते एका कपमध्ये गाळून घ्या. हा चहा प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते आणि पुन्हा पुन्हा काहीही खाण्याची इच्छा होत नाही. मेथीच्या दाण्यांचा हा चहा सकाळी किंवा संध्याकाळी पिऊ शकतो.

मेथीचे स्प्राउट्स

ज्या प्रमाणे मटकी किंवा मूगाला मोड येतात. तसेच ते मेथीच्या बियांनासुद्धा येतात. ते खाणेही वजन कमी करण्यात फायदेशीर ठरणार आहे. मेथीच्या बियांना ८-९ तास पाण्यात भिजवा आणि त्यानंतर एका सुती कापडात घट्ट बांधून ठेवा. रात्रभरानंतर लक्षात येईल की, मेथीला मोड आले आहेत. हे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT