Weight Loss Mistake esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Mistakes : कितीही प्रयत्न केले तरी पोटाची ढेरी कमीच होत नाहीय? मग तुम्हीही करताय या चूका

तूमच्या जेवणाच्या वेळेचाही वजनावर परिणाम होतो

Pooja Karande-Kadam

Weight Loss Mistakes :

पोटाची चरबी केवळ तुमचा लूकच खराब करत नाही तर तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम करू शकते. पोटावरील चरबीमुळे मधुमेह, उच्च रक्तातील साखर आणि हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात. अशा परिस्थितीत लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहार, व्यायाम आणि जिम यासारख्या गोष्टींचा त्यांच्या दिनक्रमात समावेश करतात.

परंतु असे असूनही बरेच लोक त्यांच्या पोटाची चरबी कमी करू शकत नाहीत. हार्मोन अँड गट हेल्थ कोच डायटीशियन मनप्रीत कालरा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात निरोगी आहार आणि शारीरिक व्यायामानंतरही पोटाची चरबी कमी न होण्याचे कारण स्पष्ट केले आहे.  

पोटाची चरबी कमी न होण्याचे कारण काय?

जेवणानंतर मिठाईचे सेवन करणे

जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, जी तुमच्या पोटात चरबीच्या रूपात दिसू शकते. तस 'भारतीय लोक खाने के बाद कुछ मिठा हो जाये' असं म्हणत जेवणानंतर गोड खातात. पण हे चुकीच आहे. ज्यांना वजन कमी करायच आहे त्यांनी जेवणानंतर काहीही खाऊ नये.

सकाळी लवकर चहा पिणे

रिकाम्या पोटी एक कप चहाने दिवसाची सुरुवात केल्याने तुमच्या पोटावरील चरबीवरही परिणाम होऊ शकतो, कारण चहाने दिवसाची सुरुवात केल्याने तुमच्या आतड्याच्या आवरणाला त्रास होऊ शकतो आणि ॲसिडिटीची समस्या वाढू शकते.

रात्री उशिरा जेवण करणे

रात्री झोपण्याच्या 3 तास आधी रात्रीचे जेवण करणे चांगले. पण जर तुम्ही रात्री उशिरा खाल्ले तर तुमची पचनक्रिया बिघडू शकते, ज्यामुळे तुमची चयापचय क्रिया मंदावते आणि पोटाची चरबी वाढू शकते.

अन्न कमी प्रमाणात खाऊ नका

निरोगी राहण्यासाठी, अन्नाचे अनेक भागांमध्ये विभाजन करणे खूप महत्वाचे आहे. जास्त प्रमाणात खाणे किंवा भाग नियंत्रित न केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे पोटात चरबी जमा होऊ शकते.

7-8 तास पुरेशी झोप न घेणे

निरोगी राहण्यासाठी, किमान 8 तासांची चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे. कमी झोप घेतल्याने तुमच्या पोटाभोवती चरबी जमा होऊ शकते.

भुकेपेक्षा जास्त खाणे

दिवसभर जास्त खाणे किंवा अस्वास्थ्यकर स्नॅक्स घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे पोटाची चरबी वाढू शकते.

प्रोटीनयुक्त आहार न घेणे

प्रथिने आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. पण न्याहारीमध्ये प्रथिनेयुक्त पदार्थ न घेतल्याने दिवसभरात तुमची भूक वाढू शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते किंवा पोटाची चरबी वाढू शकते.

रात्रीचे जेवण आणि नाश्ता यात फरक नाही

रात्रीच्या जेवणापासून नाश्त्यापर्यंत दोन्ही गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. परंतु या दोघांमध्ये 12 तासांचे अंतर न ठेवल्याने पोटाची चरबी वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT