Adhik Maas esakal
लाइफस्टाइल

Adhik Maas : एक महिना नॉनव्हेज खाल्लं नाही तर काय होईल?

या संपूर्ण महिन्यात तुम्ही नॉनव्हेज खाल्ले नाही तर काय होईल बरं?

साक्षी राऊत

Adhik Shravan Maas : आपल्याकडे कित्येक लोक श्रावण महिन्यात मांसाहार करणे टाळतात. या महिन्यात अनेकांच्या घरी नॉनव्हेज आणले किंवा शिजवले जात नाही. श्रावणाचा संपूर्ण महिना बऱ्याच लोकांच्या घरी पाळला जातो. या संपूर्ण महिन्यात तुम्ही नॉनव्हेज खाल्ले नाही तर काय होईल बरं? त्याचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होतो का? चला तर आज जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी चिकन-मटण सोडणे खूप कठीण असते यात काही शंका नाही, पण श्रावणात एक महिना मांसाहारापासून दूर राहावे लागल्यास तुमच्या शरीरात त्याने काय बदल दिसू शकतात माहितीये? त्याचेच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

हैदराबादच्या केअर हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अथर पाशा यांनी मीडियाला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, प्लांट बेस्ट फूड म्हणजेच शाकाहारी पदार्थांमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाच्या अनेक आजारांपासून बचाव होतो. पोटाचे आरोग्य चांगले असेल तर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहते.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत जगभरात विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये शाकाहाराचा कल हळूहळू वाढत आहे.

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या डायटिशियन, डॉ. एकता सिंघवाल यांच्या निदर्शनातूनसुद्धा हे दिसून आले आहे की, अनेक मांसाहारी लोक शाकाहाराकडे वळण्याची अनेक कारणे आहेत.

डॉ. एकता यांनी सांगितले की, मांसाहार बंद करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे सामान्यतः हृदयरोग, उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह आणि अनेक प्रकारचे कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त, आपल्या आहारात विविध व्हेज पदार्थांचा समावेश करून, आपण मांसाहारावर अवलंबून न राहता शरीरासाठी लागणाऱ्या पोषक तत्वांची गरज व्हेजमधून पूर्ण करू शकतो. एकता सिंघवाल म्हणाल्या की, व्हेजमध्ये असलेल्या फायबरमुळे चयापचय क्षमता सुधारते.

अॅसिडिटीपासून आराम

सिंघवाल म्हणाल्या की, नॉनव्हेजमुळे शरीरात जळजळ वाढते. मांसाहार कमी केल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होईल. (Non Veg)

कोलेस्ट्रॉल कमी होईल

अथर पाशा म्हणाले, व्हेज आधारित खाद्यपदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, जे कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे प्रमुख कारण आहे. हे अन्न आहारातून वगळणे किंवा मर्यादित खाणेच कोलेस्टेरॉलची पातळी सुधारू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

तुम्हाला भरपूर अँटिऑक्सिडंट्स मिळतील

व्हेज जेवणात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. फळे, भाज्या, नट्स आणि सिड्सचे सेवन वाढवल्याने आरोग्य चांगले राहते आणि आजाराचा धोका कमी होतो

पाशा यांच्या मते, व्हेज अन्न जीवनसत्त्वे, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्स प्रदान करतात जे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT