Breakfast Time esakal
लाइफस्टाइल

Breakfast Time : नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती? 90% टक्के लोकांना नाश्त्याची योग्य वेळ माहिती नाही

नाश्त्याची योग्य वेळ नेमकी कोणती हे 90% लोकांना माहिती नाही. चला तर आज याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Breakfast Time : मानवी शरीर ही एक यंत्रणाच आहे. शरीराला योग्य आहार आणि पोषण न मिळाल्याने बरेच लोक गंभीर आजारांना बळी पडतात. नाश्ता वेळेत न केल्यास एनर्जी लेव्हल डाउन होऊ शकते. साधारण सकाळी ७-१० या वेळेत बरेच लोक नाश्ता करतात. आणि हीच नाश्त्याची योग्य वेळ आहे असा अनेकांचा समजही आहे. मात्र नाश्त्याची योग्य वेळ नेमकी कोणती हे 90% लोकांना माहिती नाही. चला तर आज याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

जर तुम्ही सकाळचा नाश्ता सोडला तर रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित होते आणि रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच तुमच्या आरोग्यासाठी आणि संतुलित जीवनशैलीसाठी योग्य वेळी नाश्ता करणे खूप महत्वाचे आहे.

सकाळी योग्य वेळी नाश्ता न केल्याने तुमच्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या शरीराला योग्य वेळी पुरेसी ऊर्जा मिळाली नाही, तर तुम्हाला सकाळपासूनच थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. यासोबतच, योग्य वेळी नाश्ता न केल्याने तुमची भूक वाढू शकते, ज्यामुळे तुमच्या शरीराचे वजन वाढण्याची शक्यताही वाढू शकते.

नाश्ता करण्याची योग्य वेळ?

सकाळी ७ ते ८ ही वेळ नाश्ता करण्याची उत्तम वेळ मानली जाते. परंतु, या कालावधीत तुम्ही नाश्ता करू शकत नसल्यास, सकाळी 10 वाजण्यापूर्वी करा. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही उशिरा उठत असाल तर, झोपेतून उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करणे ही सर्वोत्तम वेळ आहे. (Breakfast)

कारण रात्रीच्या जेवणानंतर ८ तासांच्या गॅपमुळे आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि सकाळी ग्लुकोजची पातळी सहसा कमी असते. नाश्ता केल्याने आपली पचनक्रिया सक्रिय होते आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी ऊर्जा मिळते.

हेल्दी नाश्त्याचा पर्याय

नाश्त्यात फळे, भाज्या आणि तृणधान्ये घेतल्यास शरीराला फायबर मिळते जे पचनासाठी चांगले असते. तुम्ही ओट्ससुद्धा खाऊ शकता. फळ आणि भाज्यांची स्मूदी, अंडी आणि टोस्ट यांचादेखील समावेश तुम्ही नाश्त्यात करू शकता. सकाळी नाश्ता खाल्ल्याने भूक कमी होते, ज्यामुळे तुमचे जेवण नीट होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे सकाळचा नाश्ता करणे अत्यंत आवश्यक आहे. (Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT