Vaccination campaign esakal
लाइफस्टाइल

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पॅन, आधार कागदपत्रांचे काय करावे?

वेळीच कागदपत्रांबाबत दखल न घेतल्यास याचा गैरवापरही होऊ शकतो.

निनाद कुलकर्णी

जीवन आणि मृत्यू ही जीवनातील दोन कटू सत्ये आहेत ज्यातून प्रत्येकाला जावे लागते. अशा स्थितीत मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही. तथापि, फार कमी लोकांना हे माहित असेल की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर, त्याच्या सरकारी कागदपत्रांचे जसे की, वोटर आय कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सचे काय करावे. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल माहिती सांगणार आहोत.

पासपोर्ट ठेवा संभाळून

पासपोर्ट कायद्यांतर्गत, एकदा पासपोर्ट बनवला की, धारकाच्या मृत्यूनंतर तो रद्द करता येत नाही. त्याची कालमर्यादा संपली की, ती आपोआप अवैध होते. अशा परिस्थितीत गैरवापर करणाऱ्यांकडून पासपोर्टचा गैरवापर होऊ नये, यासाठी पासपोर्ट धारकाच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट कुंबियांनी त्यांच्याकडे सुरक्षितपणे ठेवावा.

मतदार ओळखपत्र रद्द करा

मतदार नोंदणी नियम, 1960 (Registration of Electors Rules, 1960) अंतर्गत मतदाराचा मृत्यू झाल्यास, त्याचे मतदार ओळखपत्र ( (Voter ID card) ) रद्द केले जावे. असे केल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होते. यासाठी मृताच्या कायदेशीर वारसाला स्थानिक निवडणूक कार्यालयात फॉर्म क्रमांक 7 भरून द्यावा लागतो. या फॉर्मसोबत मृत्यू प्रमाणपत्राची छायाप्रतही जोडावी लागते.

ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करा

मृत व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सबाबत (Driving License) प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत. मात्र, परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास, वारसदार स्थानिक आरटीओ (RTO Office) कार्यालयात जाऊन संबंधित मृत व्यक्तीचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यासाठी अर्ज करू शकतो. यानंतर आवश्यक बाबी तपासल्यानंतर मृत व्यक्तीचा परवाना रद्द केला जातो.

मृत व्यक्तीचे पॅनकार्ड सरेंडर करा

पॅन कार्ड (PAN card) हे सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. याशिवाय तुम्ही तुमची बँक खाती आणि डीमॅट खाती ऑपरेट करू शकत नाही किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करू शकत नाही. अशा परिस्थितीत, पॅनकार्ड धारकाच्या मृत्यूनंतर, सर्वप्रथम त्याच्याशी जोडलेली सर्व खाती बंद करावी. त्यानंतर आयकर विभागाकडे अर्ज करून मृत व्यक्तीचे पॅनकार्ड सरेंडर करावे.

आधार कार्ड लॉक करा

ओळख पत्राशी संबंधित कागदपत्रांमध्ये आधार कार्ड ((Aadhaar card) ) हे सर्वात महत्त्वाचे आहे. पेन्शन, शिष्यवृत्ती, एलपीजी सब्सिडी यासह सर्व योजना आधार क्रमांकाशी जोडलेल्या असतात. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्य mAadhaar अॅप किंवा UIDAI वेबसाइटद्वारे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे बायोमेट्रिक क्रेडेंशियल लॉक करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT