Black Thread In Leg esakal
लाइफस्टाइल

Black Thread In Leg : पायात काळा दोरा का बांधतात माहितीये? काय आहे त्याचे फायदे वाचा

महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा याचे देखील काही नियम आहेत

सकाळ डिजिटल टीम

Black Thread In Leg : हल्ली बऱ्याच ठिकाणी पायात काळा दोरा बांधण्याचा ट्रेंड आहे. यात आता वेगवेगळ्या स्टाइलचे दोरेसुद्धा तुम्हाला बाजारात दिसून येतील. मूळात हा फॅशन ट्रेंड जरी असला तरी काळा दोरा पायात का घालावा तुम्हाला माहितीये काय? तसेच महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा याचे देखील काही नियम आहेत.

रोज नवनव्या फॅशन बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. हल्लीच एक नवी फॅशन पाहायला मिळाली होती ती म्हणजे पायात काळा दोरा बांधण्याची. खरंतर कमरेला किंवा हाताला काळा दोरा पूर्वी बांधला जात असे. आता त्याची जागा पायात काळा दोरा बांधून घेतली गेली आहे.

मात्र पायात काळा दोरा बाधणे फॅशन ट्रेंड जरी असला तरी पायावर काळा दोरा का बांधावा?, याचे फायदे काय आहेत?, पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा?, महिलांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा? याचे काही नियम दिले गेले आहेत. त्यानुसार हा दोरा पायात बांधला तर त्याचे चांगले परिणामही पाहायला मिळतात.आधी पाहूया स्त्री आणि पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा.

पुरुषांनी कोणत्या पायात काळा दोरा बांधावा

ज्योतिष शास्त्रानुसार पुरुषांना नेहमी उजव्या पायात काळा दोरा बांधण्याचा सल्ला दिला जातो. पुरुषांनी हे लक्षात ठेवावे की त्यांनी केवळ मंगळवारीच काळा दोरा घालावा. यामुळे शनि ग्रहाला शक्ती मिळते.

पायात काळा दोरा बांधण्याचे फायदे

ज्योतिष शास्त्रानुसार पायात काळा दोरा धारण केल्याने अनेक फायदे होतात. पायात काळा दोरा धारण करणाऱ्या व्यक्तीचे वाईट नजरेपासून संरक्षण होते. मान्यतेनुसार पायात काळा दोरा धारण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहते. (Astrology)

शनीचा प्रभाव कमी होतो

ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक आपल्या पायात काळा दोरा बांधतात, त्यांच्यावर शनीची पीडा आणि साडेसातीचा प्रभाव असतो. हा प्रभाव काळा दोरा बांधल्याने कमी होतो. (Lifestyle)

कमकुवत राहू-केतू साठी

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू आणि केतू हे ग्रह कमकुवत असतात त्यांनी पायात काळे दोरा बांधल्याने लाभ होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI in Agriculture : ‘एल निनो’च्या मुकाबल्यासाठी ‘एआय’ची मदत, ४० लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; कृषी विभागाकडून सूचना

Maharashtra Finance Ministry : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे? पावसाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

Pune Water Supply: पुण्यात सोमवारपासून दिवसाआड पाणी; महापौरांच्या बैठकीत निर्णय, घटत्या पाणीसाठ्यामुळे पाऊल

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी अपडेट! कर्जमाफीची प्रक्रिया सुरू: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अंतर्गत मतभेदांमुळे ‘इंडिया’चे नेते अस्वस्थ

Trinamool Congress: ‘तृणमूल’मधील फुटीचे लोण दिल्लीपर्यंत; वीस खासदारांचा वेगळा गट, ‘एनडीए’ला पाठिंब्यासाठी पत्र

SCROLL FOR NEXT