Premarital Counseling sakal
लाइफस्टाइल

Premarital Counseling : खरंच लग्नापूर्वी प्री मॅरेज काउंसिलिंग करावं का?

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातो. हा निर्णय घेताना कधीच चुकू नये नाहीतर संपूर्ण आयुष्य पश्चातापात जाऊ शकतं.

सकाळ डिजिटल टीम

Premarital Counseling : लग्न ही आपल्या भारतीय समाजव्यवस्थेतील खूप मोठी संकल्पना आहे. लग्नामुळे दोन व्यक्तीचे आयुष्य बदलते. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातो. हा निर्णय घेताना कधीच चुकू नये नाहीतर संपूर्ण आयुष्य पश्चातापात जाऊ शकतं.

लग्नासाठी शारीरीकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही तयार राहणे, खूप जास्त गरजेचे आहे. या सर्व गोष्टीचा निर्णय घेताना खूप दडपण येतं. मग अशा वेळी प्री मॅरेज काउंसिलिंग करणे गरजेचं वाटू लागतं. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊया. (why there is need of Premarital Counseling before marriage)

प्री-मॅरेज काउंसिलिंग म्हणजे काय ?

ही एक प्रकारची थेरपी आहे जी लग्नापूर्वी केली जाते. या द्वारे तुम्ही मानसिकदृष्ट्या लग्नासाठी तयार होता. लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर तरुणांना दडपण येतं, तेव्हा यानंतर प्री-मॅरेज काउंसिलिंगच्या मदतीने त्यांच्या मनातील शंका आणि अडचणी दूर केल्या जातात.

प्री-मॅरेज काउंसिलिंगमध्ये तुम्ही तुम्हाला वाट्टेल त्या गोष्टीवर चर्चा करू शकता. तज्ञसुद्धा लग्नापूर्वी काउंसिलिंग करण्याचा सल्ला देतात. या काउंसिलिंगमुळे तुम्ही तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदाने जगू शकता.

प्री-मॅरेज काउंसिलिंगचे फायदे

  • प्री-मॅरेज काउंसिलिंगचा वैवाहीक आयुष्यावर सकारात्म प्रभाव होतो. कपल्सचे एकमेकांसोबतचे संबंध दृढ होतात.

  • एकमेकांची मते, विचार यांची देवाण घेवाण होते.

  • लग्नाबाबत सासु सासरे किंवा नातेवाईकांसोबत येणाऱ्या अडचणींना दूर करण्यास मदत करते.

  • प्रेम, विश्वास, अॅडजस्टमेंट, समजून घेणे, कौतुक करणे, सपोर्ट करणे यामुळे नातं कसं दृढ बनवता येईल, यास मदत होते.

  • नात्यातील ताण तणाव दूर करण्यास मदत करते.

  • पॉझिटिव्ह मदत करण्यास मदत करते.

  • तुम्ही लग्नासारखा मोठा निर्णय घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT