Johanna Mazibuko esakal
लाइफस्टाइल

'हे' दोन पदार्थ खाल्ल्यामुळं 128 वर्षीय महिलेला मिळालं 'दीर्घायुष्य'

सकाळ डिजिटल टीम

चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळं लहान वयातच अनेक आजारांनी लोकांना घेरलंय.

चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली (Lifestyle) यामुळं लहान वयातच अनेक आजारांनी लोकांना घेरलंय. यातील अनेकांना जीवघेण्या आजारांनाही सामोरं जावं लागतंय. यामुळं अनेक वेळा माणसाचा अकाली मृत्यू होतो. तथापि, काही लोक असे आहेत ज्यांना त्यांचा योग्य आहार आणि जीवनशैलीमुळं दीर्घायुष्य मिळतं. अशीच एक महिला आहे, जिनं नुकताच 11 मे रोजी आपला 128 वा वाढदिवस साजरा केलाय.

असा दावा केला जातोय की, ती सध्या जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती आहे. 11 मे 1894 रोजी दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या जोहाना माझिबुकोचा (Johanna Mazibuko) जन्म एका मक्याच्या शेतात झाला होता आणि ती 12 भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे.

जोहानानं स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'आमचं कुटुंब निरक्षर होतं आणि आम्ही शेतात बराच वेळ घालवायचो. मला चांगलं आठवतं, मी लहान असताना शेतात टोळांवर हल्ले करायचे. आम्ही त्या टोळांना पकडून तळून खायचो. पण, जसजसं मोठं होत गेलो, तसतसं मी दूध आणि रानपालक खायला सुरुवात केली.

Johanna Mazibuko

जोहाना पुढं म्हणाली, 'आता मी सध्याचा पदार्थ खातो, पण मला माझ्या लहानपणीचा तो पदार्थ (दूध आणि जंगली पालक) आठवतो. माझं लग्न एका वृद्धाशी झालं होतं, ज्याचं नाव स्तवाना माझिबुको (Stawana Mazibuko) होतं. माझ्या नवऱ्याची पहिली बायको वारली होती. माझ्या पतीकडं भरपूर गायी आणि घोड्याचे तबेले होते. माझे पती आणि त्यांची पहिली पत्नी मेस्तवाना यांना 7 मुलं होती, त्यापैकी 2 आजही जिवंत आहेत. मेस्तवाना आणि माझ्या 2 मुलांव्यतिरिक्त मला जवळपास 50 नातवंडं देखील आहेत.

जोहाना म्हणाली, 'लग्नानंतर मी फार्मवर काम करायला लागलो. शेतात काम करण्याबरोबरच मी कपडे साफ करणे आणि धुण्याचं कामही केलं. माझा विश्वास आहे की, जोपर्यंत कोणाकडं पैसा नाही तोपर्यंत त्याला खूप संघर्ष करावा लागतो. मला आत्ता नीट ऐकू येत नसलं तरी मला सगळं दिसतंय. जेव्हा मी लोकांना चालताना पाहतो, तेव्हा मलाही वाटतं की मी त्यांच्यासारखं चाललं असतं, अशी खंत व्यक्त करत त्या म्हणाल्या, माझा एक केअरटेकर आहे, जो 2001 पासून माझ्यासोबत आहे. ती माझ्यासाठी इतकी खास झालीय की, ती जवळ येईपर्यंत मला झोपही येत नाही, असं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मालवणी पॅटर्न वादावर असलम शेख यांचे अमित साटम यांना खडेबोल

Pimpri Chinchwad News : अवजड वाहने, खड्डे ठरतायत ‘काळ’; हिंजवडी–ताथवडे पट्ट्यात महिनाभरात दोघींचा मृत्यू!

Sweetlime Rate Decrease : मोसंबी नऊशे रुपये, तर कापुस सात हजार रुपये प्रति क्विंटल

Gadchiroli Premier League: गडचिरोलीत पुन्हा रंगणार क्रिकेटचा उत्सव; महिला क्रिकेट संघाचाही होणार समावेश!

SCROLL FOR NEXT