Women Health  esakal
लाइफस्टाइल

Women Health : मासिक पाळी नियमित येते, तरीही गर्भधारणा होत नाहीय? एकदा या कारणांचाही विचार करून पहा

अनेक महिलांना सगळं काही व्यवस्थित असतं तरी गर्भ राहत नाही

Pooja Karande-Kadam

Women Health :

आजच्या धावपळीच्या जीवनात आणि करिअर घडवण्याच्या स्पर्धेमध्ये स्त्रिया आणि पुरुष 30 वर्षांनंतर लग्न करतात. ज्यामुळे लोकांना फॅमिली प्लॅनिंगमध्ये अनेक समस्या येतात. अनेक स्त्रियांची अशी तक्रार असते की, माझी मासिक पाळी वेळेवर येते. तरी मला गर्भ राहत नाही, असे का?

गर्भधारणेसाठी मासिक पाळी नियमित येणं ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते. त्यामुळे अनेक मैत्रिणींचा प्रश्न असतो की, आम्हाला वेळेत पाळी येते. तर आम्हाला लवकर प्रेगन्सी राहत नाही. हे कशामुळे होते, याची काही कारणे आपण जाणून घेऊयात.

आजकाल अनेक महिलांना सगळं काही व्यवस्थित असतं तरी गर्भ राहत नाही. असे कशामुळे होते, याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. आणि त्यावर काय उपाय करता येतील याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊयात.

नियमित मासिक पाळी येऊनही गर्भधारणा का होत नाही?

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, नियमित मासिक पाळी येऊनही जर एखाद्या महिलेला गर्भधारणा होत नसेल तर या अवस्थेला ॲनोव्ह्युलेटरी सायकल म्हणतात. या स्थितीत मासिक पाळीच्या वेळी अंडाशयातून अंडी बाहेर पडत नाहीत, त्यामुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवते.

PCOS

आजकाल, अनेक मुली आणि स्त्रिया पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS च्या समस्येशी झुंजत आहेत. हा एक प्रकारचा विकार आहे ज्यामध्ये चयापचय आणि हार्मोनल असंतुलनामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. PCOS मध्ये, अनेक स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येते पण गर्भधारणा होत नाही.

जास्त किंवा कमी वजन

अनेक वेळा स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येते पण त्यांचे वजन अती कमी किंवा प्रमाणाच्या बाहेर अधिक असते. त्यामुळे गर्भधारणेत समस्या निर्माण होते. गरोदरपणासाठी शरीर तंदुरुस्त राहणे आणि वजन नियंत्रणात असणे अत्यंत आवश्यक आहे.

थायरॉईड

आजकाल बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक महिलांना थायरॉईडचा त्रास होत आहे . शरीरातील थायरॉईडची पातळी खालावल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. थायरॉईडची पातळी खालावल्याने महिलांमध्ये वंध्यत्व येऊ शकते.

व्यायाम

जर तुम्ही दररोज अती व्यायाम करत असाल तर त्यामुळे गर्भधारणा होण्यातही समस्या निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत बाळाची अपेक्षा करणाऱ्या महिलांनी हलक्या व्यायामासोबत योगासने आणि प्राणायाम करावा.

गरोदराबाबत सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी जीवनशैलीत करा हे बदल

गरोदर राहण्यासाठी रोज योगासने सुरू करा. भुजंगासन, बटरफ्लाय आणि मत्यासन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि गर्भधारणा होण्याची शक्यताही वाढते.

दररोज तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा आणि हा नियम पाळा. लक्षात ठेवा की तुम्ही 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे, यामुळे शरीरातील हार्मोनल असंतुलनाची समस्या कमी होऊ शकते.

तुमच्या आहारात ओमेगा 3 समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा, दररोज अशा गोष्टी खा ज्या शरीराला हेल्दी फॅट्स देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT