Work from home
Work from home esakal
लाइफस्टाइल

Work From Home Jobs : गृहिणींसाठी फायद्याचे कोर्सेस; जे घरबसल्या पैसे मिळवून देतील!

सकाळ डिजिटल टीम

गृहिणी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती किचन कट्टा सांभाळणारी स्त्री. जी नेहमी कामात असते तरी तिच्या कामाबद्दल फार कौतूक होत नाही. घर सांभाळणाऱ्या स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. कारण, ती पैसे न कमावता नेहमीच घरखर्चासाठी पैसे मागत असते.

कोरोना काळात व्यवसाय, नोकरी संदर्भात एक नवी कल्पना उदयास आली आहे. ती म्हणजे वर्क फ्रॉम होम.याच धर्तीवर घर आणि काम सांभाळण्याची नवी संधी उपलब्ध होत आहे. आज त्याच बद्दल जरा माहिती घेऊयात.

जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तूमच्याकडून काम करवून घेऊ इच्छित आहेत. पण, केवळ कौशल्य नसल्याने महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामूळे महिला केवळ होम मेड केक आणि सुई दोरा यातच अडकून पडतात. त्यांच्यासाठीच आज आपण असे काही कोर्स पाहुयात जे घरबसल्या तूम्हाला हजारो रूपये कमावून देऊ शकतात.

इंटेरिअर डिझायनिंग

इंटेरिअर डिझायनिंग हि गोष्ट महिलांपेक्षा अधिक चांगली कोणीही करू शकत नाही. कारण, घरात सर्वात जास्त काळ त्याच असतात. त्यामूळे त्यांच्या इतकं क्रिएटीव्ह कोणीही असू शकत नाही. त्यासाठीच महिलांनी महिन्याला केवळ ५००० महिना भरून हा कोर्स करावा. यात photoshop launch, interior design basic, free home decor class अशा वेबसाईटवर माहिती मिळवू शकता. 

ऑनलाईन शिकवणी

घरबसल्या काही करायचा विचार करत असाल तर शिकवणी घेणे हा चांगला पर्याय आहे. पूर्वी लहान मुले घरोघरी जाऊन शिकत होती. पण, कोरोना काळात ऑनलाईन शिकवणी सुरू झाली. त्यामूळेच तूम्हीही तूमचं घरं मुलं सांभाळत इतर मुलांना शिकवण्याचे काम करू शकता.

कंटेंट रायटींग

तुम्ही चांगलं लिहू शकत असाल तर तूम्ही कंटेंट रायटींगचा नक्की विचार करू शकता. तुम्ही नव्या कल्पना मांडू शकता?तुमची कल्पनाशक्ती उत्तम आहे? कमी शब्दात आशयपूर्ण लिहिता येतं? तुमचं भाषेवर प्रेम आहे? मग हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. आजकाल जाहिराती तयार करणे, ब्लॉग लिहिणे ही कामे सर्रास चांगला पैसा मिळवून देणारी आहेत, पण त्यासाठी पण कोर्स करणे आवश्यक आहे. ३००० ते ४००० मध्ये हा कोर्स तुम्ही करू शकता.

जाहीरात मार्केटींग

हे युग जाहिरातीचे आहे, पण इंटरनेटमुळे बहुतांश गोष्टी या ऑनलाईन झाल्या आहेत.एखाद्या कंपनीचे प्रोफाईल तयार करणे, त्याची विविध ग्रूपमध्ये जाहिरात करणे, लोकांपर्यंत त्याची माहिती पोचवणे हे सारे डिजिटल मार्केटिंग मध्ये येते. हे काम तुम्ही कुणाच्याही ऑफिसला न जाता घरातून करू शकता. त्यासाठी विविध कोर्स आहेत त्यातील कोर्स तुम्हाला या कामाची नीट माहिती देऊ शकतो.

फिट राहण्याचे सल्ले

तूम्ही स्वत: फिट असाल तर इतरांना फिट राहण्याचे सल्ले देऊ शकता. कारण, लोकांना एखादा कोर्स जॉईन करून वजन कमी करणे, फिट राहणे परवडणारे नाही. आणि त्यासाठी वेळही मिळत नाही. त्यामूळे लोकांना ऑनलाईन योगा, फिटनेसचे धडे देणे हे काम सोपे असून त्यातून पैसेही मिळतील.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT